Sushma Andhare : "लोढांनी फार लोड घेऊ नये, तुमच्या घरात देखील महिला" ; सुषमा अंधारे कडाडल्या!

Sushma Andhare
Sushma Andhare

महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधवांचा सन्मान करण्यासाठी नवा शब्द सुचवला आहे. ते म्हणतात की विधवा स्त्रियांना गंगा भागीरथी म्हटले पाहिजे. लोढा यांनी बुधवारी प्रधान सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर काही सामाजिक व महिला कार्यकर्त्यांनी टीका केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील  मंगल प्रभात लोढा यांच्यावर टीका केली आहे. 

विधवा महिलांना समाजात जगण्याचा, नैतिक अधिकार कसा प्राप्त करता येईल, यावर लोढा यांनी आपली बुद्धी खर्चीक घालावी. बाकी आम्ही महिला काय नाव लावायची आणि काय लावू नये, हे ठरवू. लोढांनी फार लोड घेऊ नये, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. 

सुषमा अंधारे म्हणाले, महिलांबाबत प्रचंड असंवेदनशीलतेने विधाने येत आहेत. ती विधान विशेषता भाजप आणि शिंदे गटाकडून येत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे गांभीर्याने घ्यावे कारण त्यांच्या घरात देखील महिला आहेत. 

Sushma Andhare
Devendra Fadnavis : आम्हांला अजून 'त्या' मतदारसंघांपर्यंत पोहोचायचं आहे; फडणवीसांच्या विधानाने खळबळ

काय म्हटलं आहे या प्रस्तावात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी दिव्यांग ही संकल्पना जाहीर केली. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजात मानाचं स्थान मिळालं आणि समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागिरथी (गं.भा.) हा शब्द वापरण्याबद्दलचा प्रस्ताव तयार करून चर्चा करावी.

Sushma Andhare
Asad Ahmed Encounter: गँगस्टर अतिक अहमदला मुलाच्या एन्काऊंटरची आधीच लागली होती कुणकुण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com