महिलेच्या खात्यात बँकेने चुकुन जमा केले २६२ कोटी; अन्...

वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

अमेरिकेतील टेक्सास येथिल रुथ बॅलून यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा झालेली रक्कम पाहून रुथ बॅलून यांना एकच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या अकाऊंटमध्ये ३७ मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रकमेनुसार जवळपास २६२ कोटी रुपये जमा झाले आहेत. अकाऊंटमध्ये इतकी रक्कम जमा झाल्याचं पाहून रुथ बॅलून यांना प्रचंड आनंद झाला. यानंतर त्यांनी ही माहिती आपल्या पतीला दिली. 

टेक्सास (अमेरिका): अमेरिकेतील टेक्सास येथिल रुथ बॅलून यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा झालेली रक्कम पाहून रुथ बॅलून यांना एकच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या अकाऊंटमध्ये ३७ मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रकमेनुसार जवळपास २६२ कोटी रुपये जमा झाले आहेत. अकाऊंटमध्ये इतकी रक्कम जमा झाल्याचं पाहून रुथ बॅलून यांना प्रचंड आनंद झाला होता, परंतु काही काळातच त्यांच्या आनंदावर विरजन पडले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यांच्या पतीने रुथ बॅलून यांना तात्काळ बँकेशी संपर्क साधून या रकमेबद्दल विचारण्यास सांगितले. ज्यावेळी रुथ बॅलून यांनी बँकेशी संपर्क साधला त्यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही रक्कम चुकून तुमच्या बँकेत जमा झाली आहे. बँकेने या घडलेल्या प्रकरणी माफीही मागितली.  ही रक्कम रुथ बॅलून यांच्या बँक अकाऊंटमधून काढली.

दिल्लीतील हिंसाचाराबाबत सुप्रिया सुळे; म्हणतात...

बँकेने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, आमच्यापैकी एका कर्मचाऱ्याने चुकून हे पैसे रुथ बॅलून यांच्या बँक अकाऊंटवर जमा केले. तांत्रिक कारणामुळे बँकेची सिस्टम बंद होती आणि त्यामुळे आमच्या बँक कर्मचाऱ्याने मॅन्युअल पद्धतीने रक्कम डिपॉझिट करणं सुरु केलं होतं. यादरम्यान आमच्या बॅंक कर्मचाऱ्याने चुकून पैशांच्या जागी बँक अकाऊंट नंबर इंटर केला यामुळे पैसे थेट रुथ बॅलून यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर झाले.

मुलाच्या छळाला कंटाळून मातेने कवटाळला रेल्वेरुळ

आपल्या बँक अकाऊंटमध्ये इतकी मोठी रक्कम जमा झाल्याचं पाहून रुथ बॅलन यांनी लगेचच अनेक स्वप्न रंगवली. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना रुथ बॅलून यांनी सांगितले की, "कोणीतरी खरोखर २६२ कोटी रुपये मला गिफ्ट केले असावेत असं मला वाटलं. मी पैसे खर्च करण्याचंही विचार केला तसेच काही रक्कम दान करण्याचं ठरवलं होतं असं त्यांनी सांगितलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Texas woman shocked to find $37 million accidentally deposited into her bank account

टॅग्स
टॉपिकस