'जशास तसं'; योगींचं मुंबईत तर ठाकरे सरकारचं अयोध्येत कार्यालय

मुंबईमध्ये उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut Allegations on Kirit Somaiya
Sanjay Raut Allegations on Kirit SomaiyaSakal

महाराष्ट्रातल्या विविध प्रमुख नेत्यांचे उत्तर प्रदेशात दौरे सुरू असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांनी एक मोठी घोषणा केली. मुंबईतल्या उत्तर भारतीयांसाठी योगी सरकार कार्यालय सुरू करणार असल्याचं सांगण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारही अयोध्येत आपलं कार्यालय सुरू करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) हा निर्णय घेण्यात आल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut Allegations on Kirit Somaiya
शरद पवार मोदींचे गुरू; ते त्यांच्या सल्ल्यानुसार काम करतात - संजय राऊत

मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणतात, "त्यावर सरकार उत्तर देईल. कोणत्या जागेवर कार्यालय उभं करणार. मला वाटतं, मुंबई, नवी मुंबईत अनेक राज्यांची कार्यालयं आहेत. देश एक आहे असं आपण म्हणतो, तेव्हा आम्ही कोणत्याही राज्यात जाऊ येऊ शकतो. आम्हीही अयोध्येत जाऊन महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी एक सेंटर उभं करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केलीये. आम्हीही लखनौला करू, वाराणसीला करू. हा सरकार टू सरकार प्रश्न आहे".

Sanjay Raut Allegations on Kirit Somaiya
मुंबईत योगी सरकारचं कार्यालय; राज ठाकरेंच्या भूमिकेचे पडसाद?

मुंबईतल्या उत्तर भारतीय नागरिकांचे नोकरी आणि व्यवसायासंदर्भातले प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचं योगी आदित्य नाथ यांनी सांगितलं होतं. मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय राहतात. योगी सरकारच्या या कार्यालयामुळे मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना राज्य सरकारचे लाभ घेता येणार आहेत. उत्तर भारतातले मुंबईत राहणारे मोठे गुंतवणूकदार, ज्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com