उपमुख्यमंत्री हे सुपर CM बनू पाहत आहेत, ही टीका पहिल्यांदा झालेली नाही

इंदिरा गांधी समर्थक असल्याने नासिकराव तिरपुडेंना आपलं सरकारवर वर्चस्व असावं असं वाटायचं
Vasantdada Patil
Vasantdada Patil E sakal

महाराष्ट्रात २० जूनपासून अनेक घडामोडी घडल्या बंडखोरी करत एकनाथ शिंदेचा गट शिवसेनेतून बाहेर पडला आणि भाजपा बरोबर युती करत सत्तास्थापनेचा दावा केला. तसेच त्यानंतर पत्रकार परिषद झाली. तेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असे तर्क लावले जात होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील असं सांगताच सगळ्यांना धक्का बसला होता. आपण या सरकारमध्ये नसणार, असंही त्यांनी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

मात्र पत्रकार परिषद होताच काही वेळात केंद्रातून आलेल्या फोननंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागेल असे आदेश आले आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उप-मुख्यमंत्री झाले. यानंतर सगळीकडे एकच चर्चा रंगली, ती देवेंद्र फडणवीस हेच सरकारचं नियंत्रण करतील याची, याचा प्रत्यय लगेच यायला सुरुवातही झालीय.

उप-मुख्यमंत्री फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबरच दिसू लागले. विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री -उप-मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र एका पत्रकाराच्या प्रश्नावर फडणवीसांनी त्यांच्यासमोरचा माईकच उचलला आणि उत्तर दिलं. पहिली कॅबिनेट बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद झाली , तेव्हाही देवेंद्र फडणवीसांनी एक चिठ्ठी लिहुन एकनाथ शिंदेंच्या समोर ठेवली. हे मात्र चाणाक्ष जनतेच्या नजरेतून सूटलं नाही. सोशल मिडीयावर नेटीझन्सने देखील यावर आपली मतं व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्वतंत्रपणे काम करु देतायत कि नाही याचीही चर्चा झाली.

यानिमित्ताने उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातील एक किस्सा या ठिकाणी नक्कीच आठवतो. तो म्हणजे मुख्यमंत्री वसंतराव पाटील आणि उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे यांच्यामधला. नासिकराव तिरपुडे हे इंदिरा गांधी यांचे खंदे समर्थक होते.

१९७७ साली इंदिरा गांधी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्या, त्यांनी जानेवारी १९७८ मध्ये इंदिरा कॉंग्रेस नावाचा पक्ष काढला. त्यात महाराष्ट्रातील नासिकराव तिरपुडे आणि रामराव आदिक हे महाराष्ट्रातील महत्वाचे नेते होते. तर ब्रम्हानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांच्याकडे कॉंग्रेसचं नेतृत्व होतं. यशवंतराव चव्हाण , शरद पवार आणि वसंतदादा पाटील व वसंतराव नाईक देखील कॉंग्रेसमध्येच राहिले. त्याचवेळी केंद्रात मोरारजी देसाईंचं सरकार आलं आणि महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुक झाली, यात इंदिरा कॉंग्रेसला ६२ तर रेड्डी कॉंग्रेसला ६९जागा मिळाल्या होत्या. मात्र जनता पक्षाला ९९ जागा जिंकल्यामुळे दोन्ही कॉंग्रेसनी महाराष्ट्रात आघाडी केली आणि वसंतराव पाटलांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं, तर नासिकराव तिरपुडे यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं होतं.

तेव्हा राज्याला पहिला उप-मुख्यमंत्री मिळाला. मात्र इंदिरा गांधी समर्थक असल्याने नासिकराव तिरपुडेंना आपलं सरकारवर वर्चस्व असावं असं वाटायचं. त्यामुळे सरकारी कामाच्या फाईली देखील आधी आपल्याकडे याव्यात असा त्यांचा आदेश होता. तसंच मुख्यमंत्री वसंतराव पाटलांनी पत्रकार परीषद घेतली तरीही नासिकराव तिरपुडे पत्रकार परिषद घेत असतं. यामुळे वसंतराव पाटील वैतागले होते तर यशवंतराव चव्हाण देखील नाराज होते.

Vasantdada Patil
आमचा कुणी सुपर CM नाही, आमचे एकच CM ते म्हणजे एकनाथ शिंदे - फडणवीस

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील आपल्या 'लोक माझा सांगाती' या आत्मकथेत याविषयी लिहीताना म्हंटलंय...'' या सरकारचा पायाच ठिसूळ होता , दोन्ही पक्षाच्या अविश्वासाच्या वातावरणात ते तयार झालं होतं , या दोघांमध्ये कमालीची कटुता होती....'' असं म्हंटलंय.....

कॉंग्रेस आणि आय कॉंग्रेस खरतर मूल एकाच पक्षातील दोन गट होते. पण इंदिरा गांधीवर निष्ठा असणारे नेते मात्र आपलं वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यात उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे मुख्यमंत्र्यांची हेटाळणी करत असतं. यामुळे पुढे ही धुसफूस बंडाच्या रुपाने बाहेर पडली.

सध्या जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड तर बंड यशस्वी करण्यासाठी भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न सर्वात जास्त होते. तसंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत देवेंद्र फडणवीसांची भूमिका महत्वाची होती. ''देवेंद्र फडणवीसांना उप-मुख्यमंत्री केल्यानंतर मात्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षेला धक्का लागला. त्यानंतर मात्र त्यांनी आपलं वर्चस्व राखण्यास सुरुवात केलीय. आणि ते स्पष्टपणे दिसतंय असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारेंनी व्यक्त केलं.

एकनाथ शिंदे- फडणवीस सरकारचा अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावर शिवसेना नेते ,संजय राऊत यांनी जोरदार टिका करत हे तर दोघांचं कॅबिनेट असल्याचं म्हंटलं.

ज्येष्ठ नेते शरद पवारांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्री नंतर उप-मुख्यमंत्री झाले असा टोला देवेंद्र फडणवीसींना लगावला.

राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार न करता घेतले जाणाऱ्या महत्वाच्या निर्णयासंबंधी विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. मंत्रालयातही उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली पकड तयार केलीय हे वेगळं सांगायला नकोच. त्यामुळे आता शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे आणि आपल्या महत्वाकांक्षा बाजूला ठेवावी लागलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार नेमकं किती लांब चालेल हे पहावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com