Tukaram Mundhe on Reservation
esakal
आरक्षणाचा फायदा एका पिढीने घेतल्यानंतर पुढच्या पिढीला तोच लाभ मिळू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. मात्र, त्याआधी संबंधित समाजाला समानतेच्या पातळीवर आणणं गरजेचं आहे, अशी भूमिका अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली आहे. पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जात आरक्षण आणि महिला आरक्षणासंबंधी प्रश्न उपस्थित झाला. त्यावर मुंढे यांनी आपलं मत स्पष्ट केलं. कार्यक्रमानंतर पत्रकारांनीही त्यांना याच विषयावर विचारलं असता त्यांनी आपली भूमिका पुन्हा मांडली.