

Tukaram Mundhe Clarifies Transfer Rumours
esakal
Tukaram Mundhe Clarifies Transfer Rumours : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थ, अस्वच्छ हॉटेल्स, डेअरी आणि खाद्य आस्थापनांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एफडीएच्या पथकांकडून राज्यभरात सातत्याने तपासण्या आणि कारवाया सुरू असल्याने मुंढे पुन्हा चर्चेत आले आहेत. याचदरम्यान त्यांच्या बदलीबाबतचा एक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.