EXIT Poll : भाजपला 123 तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळतील एवढ्या जागा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

पुणे : टीव्ही-9 सिसेरो एक्झिट पोलचा अंदाज आला असून त्यांच्या अंदाजानुसार भारतीय जनता पक्षाला 123, शिवसेनेला 74, काँग्रेसला 40 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 35 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

टीव्ही-9 सिसेरो एक्झिट पोलच्या अंदाजानुसार  भाजप-सेना महायुतीला जवळपास 200 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रावादी आघाडीला 75 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतर पक्ष आणि अपक्षांना 10-12 जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

या निवडणुकीत हरलेत मुंडेसाहेब !

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील 3237 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

महायुतीला 192 तर महाआघाडीला मिळतील एवढ्या जागा

राज्य विधानसभेच्या 288 जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाले. राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान झाले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tv9 Exit poll BJP get 123 seats in Vidhansabha election