
गोपिनाथ मुंडे यांनी त्यांचा राजकीय आलेख वाढवताना कायम आपल्यापेक्षा तुल्यबळ व्यक्तीवर निषाणा साधत अस्तित्व निर्माण केले. यात कुटुंबाला कधीही आणण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र त्यांच्या पश्चात मुलगी आणि पुतणे यांनी कौटुंबिक वाद ठेवत त्यांचाच पराभव केला असल्याचे दिसत आहेत.
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर भाषणातून असभ्य टिपण्णी केल्याचा आरोप विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आला. या कथित व्हिडिओ क्लिप प्रकरणावरून गेले दोन दिवस बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा ढवळून निघाला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या भावनिक सादेचा परिणाम निवडणूक निकालांवरही होईल. मात्र, यापेक्षा याचा दूरगामी परिणाम पंकजा आणि धनंजय यांच्या राजकीय वाटचालीवर होणार आहे. याची कल्पना दोघांनाही नसेलच असे नाही.
पंकजा मुंडेंविरोधातील क्लिपमुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा
दरम्यान, गोपिनाथ मुंडे यांनी त्यांचा राजकीय आलेख वाढवताना कायम आपल्यापेक्षा तुल्यबळ व्यक्तीवर निषाणा साधत अस्तित्व निर्माण केले. यात कुटुंबाला कधीही आणण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र त्यांच्या पश्चात मुलगी आणि पुतणे यांनी कौटुंबिक वाद ठेवत त्यांचाच पराभव केला असल्याचे दिसत आहेत.
तुमचं थांबणं, पुढच्या पिढीला परवडणारं नाही; प्रीतम मुंडेंचं भावनिक आवाहन
पंकजा आणि धनंजय यांनी कथित व्हिडिओ क्लिप प्रकरणाला मोठ्या प्रमाणावर हवा देण्याचा प्रयत्न करत भावनिकतेचे राजकाकरण करण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न दिसून येतो. मु्ळात, धनंजय आणि पंकजा हे दोघेही आपण गोपिनाथ मुंडे यांचे खरे वारसदार असल्याचे सांगतात. पण, खरंतर या कथित प्रकरणात आज दोघांनीही गोपिनाथ मुंडेंचाच पराभव केलेला दिसतो. 24 तारखेला या प्रकरणाचा कोणाला फायदा अन् कोणाला तोटा होईल हे लक्षात येईलच.
भाजप सोशल मीडियाविरुद्ध परळीत गुन्हा
गोपिनाथ मुंडेनी राजकीय जिवनात टीका करताना नेहमी छगन भुजबळ आणि विलासराव देशमुख यांच्यासमोर मैत्रीचा हात पुढे करताना त्यांच्यापेक्षा कितीतरी तुल्यबळ असणाऱ्या शरद पवार यांच्यावर टीका केली आणि आपला राजकीय हेतू साध्य करून घेतला. आता धनंजय आणि पंकजा हे एकमेकांवर टीका करून आणि एकमेकांना शत्रू करून स्वतःलाच संपवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. राजकारणात तुमचा शत्रु किती मोठा यावरून तुमची किंमत होत असते. गोपिनाथ मुंडेनी शरद पवारांना शत्रू करून ते एक-एक पायरी चढत गेले. पंकजा आणि धनंजय दोघांनाही शत्रू कोण निवडावा हेच कळलं नाही. त्यांनी आपसात शत्रुत्व उभं केलं. दोघेही महाराष्ट्राचे नेते ठरण्याऐवजी बीडपुरतेच नेते झाले. परिणामी राष्ट्रीय नेतृत्वाचा ऱ्हास झाला, असे म्हणावे लागेल.
रक्ताची नातीच सर्वांत जास्त घाव करतात : पंकजा मुंडे
राहता राहिला प्रश्न पंकजा यांना भोवळ येण्याचा तर, त्यांच्याच पक्षाच्या नितीन गडकरी यांनाही नेहमीच भोवळ येते. पण, ते असे काम सोडून दोन दिवस घरात बसत नाहीत किंवा कुठल्याही गोष्टीचा इव्हेंट तयार करत नाहीत. गडकरी सकाळी पुण्याच्या सभेत कोसळले तरी ते पुढचा कार्यक्रम रद्द करत नाहीत, किंवा फडणवीस नागपूरातले आहेत म्हणून ते फडणवीसांना विरोध करत बसले नाहीत. म्हणूनच, ते मोदींना पर्याय म्हणून पुढे येतात. आराम हवा पण राजकीय जिवनात शारीरीक, भावनिक हतबलतेकडे जनता दुर्बलता म्हणून बघते हे लक्षात घ्यायला हवं. यातूनच पंकजा यांनी शिकायला हवं.
सहानुभूती मिळविण्याचा प्रकार जनतेसमोर : धनंजय मुंडे
राजकीय आकांक्षा असताना वाद कोणाच्या घरात नाहीत, ठाकरेंच्या घरात आहेत, पवारांच्याही असतील. पण, राज ठाकरेंनी तर आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवारही दिला नाही, पवारांच्या घरातील वाद कधीही चव्हाट्यावर आला नाही. मग, गोपिनाथ मुंडेचा वारसा सांगणाऱ्यांचाच वाद त्यांच्या पश्चात असा चव्हाट्यावर का यावा? यात धनंजय आणि पंकजा यांच्यापेक्षा गोपिनाथ मुंडे यांचा मोठा पराभव आहे.