महाराष्ट्राला हवा देवेंद्र; फडणवीसांच्या समर्थनार्थ ट्विटरवर पाहा सुरू झाला ट्रेंड

twitter trend in support of devender fadnavis
twitter trend in support of devender fadnavis

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपमध्ये जोरदार जुंपलीय. मुख्यमंत्री कोण हाच प्रश्न प्रत्येकाला पडलाय. या पार्श्वभूमीवर ट्विटरवरही नेटिझन्स मुख्यमंत्रिपदाबाबत आपली मतं व्यक्त करतायंत. त्यात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ ट्विटरवर मोहीम सुरू करण्यात आली आहे. #MaharashtraNeedsDevendra हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे. फडणवीस हे जनमतातलं नेतृत्त्व असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

का सुरू झाला ट्रेंड?
सोमवारी #RejectFadnavisForCM आणि #RejectFadnavisAsCM हे दोन हॅशटॅग्ज ट्रेण्डमध्ये होते. त्यानंतर सोशल मीडियावरील फडणवीस समर्थक पुढे आले आणि त्यांनी फडवणीस यांच्या समर्थनार्थ  #MaharashtraNeedsDevendra असा ट्रेंड सुरू केला. त्यात फडणवीस यांच्या गेल्या पाच वर्षांतील कारकिर्दीच्या जमेच्या बाजू मांडण्यात येत आहेत. यात शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमुक्ती, भरपाईसाठी दिलेले 10 हजार कोटी, असे मुद्दे मांडण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्रात पुन्हा ढोंगी आणि भ्रष्ट सरकार नको, असेही काही जण मत व्यक्त करत आहेत. महाराष्ट्राला गेल्या पाच वर्षांतील स्थिर सरकारप्रमाणेच या वेळी स्थिर सरकारची गरज असल्याचे फडणवीस समर्थकांचे म्हणणे आहे.

काय होता पहिला ट्विटर ट्रेंड?
दरम्यान, 4 नोव्हेंबर सकाळपासून ट्विटरवर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी नको असा ट्रेंड सुरु झाला होता. ट्विटरवर  बेरोजगारी, आरेतील वृक्षतोड, शेतकरी आत्महत्या, पूर परिस्थिती हे मुद्दे उपस्थित करून, देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात येत आहे. सत्ता स्थानपनेबाबत भाजप-शिवसेनेकडून अद्याप काही निश्चित सांगण्यात येत नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच ट्विटरवर सोमवारपासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी पुन्हा नकोत, असा ट्रेंड सुरू झाला होता. #RejectFadnavisForCM आणि #RejectFadnavisAsCM हे दोन हॅशटॅग सुरू होते. या माध्यमातून फडणवीसांविरुद्ध नाराजी व्यक्त झाली.  कोल्हापूर-सांगलीतील पूर परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश, शेतकरी आत्महत्या, आरेमधील वृक्षतोड, बेरोजगारी अशा मुद्द्यांवरून फडणवीसांना घेरण्यात येत आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे, असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईन'च्या या घोषणेची खिल्ली उडविण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com