दोन आठवडे वादळी पावसाच्या छायेत! सक्रिय पश्‍चिम विक्षोभ ठरतोय कारण

rain Maharashtra Weather forecast
rain Maharashtra Weather forecastsakal
Updated on: 

अकोला : ऋतूबदल आणि पश्‍चिम विक्षोभाच्या सक्रियतेमुळे राज्यभरात वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. दोन आठवड्यांपर्यंत ही स्थिती राहण्याचे संकेत हवामान अभ्यासकांनी (Meteorologist) दिले आहेत.

गेल्या काही दशकांपासून ऋतुचक्रात आमूलाग्र बदल तर झाला आहेच सोबतच प्रत्येक ऋतूमध्ये हवा, ऊन, पावसाची अनिश्‍चितता सुद्धा वाढली आहे. त्यामुळेच जवळपास महिनाभर उशिरा मॉन्सूनचे आगमन, डिसेंबर अखेरपर्यंत थंडीची दांडी आणि उन्हाळ्यात पावसाची हजेरी, असा बदल विदर्भासह महाराष्ट्रात अनुभवायला मिळत आहे.

rain Maharashtra Weather forecast
बुलडाणा : लग्न जुळत नसल्याने युवकाने स्वतःचे सरण रचून केली आत्महत्या

या बदलाचा मानवी आरोग्यासोबतच पीक पद्धतीवर मोठा परिणाम झालेला आहे. एरव्ही मे च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी लागायची आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापासून विदर्भासह महाराष्ट्रात जोरदार मॉन्सून बरसरायचा. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच थंडी पडायला सुरुवात व्हायची व नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये गुलाबी थंडीचा अनुभव वैदर्भीयांना मिळायचा आणि फेब्रुवारीपासून उन्हाळा तापायला सुरुवात व्हायची. मात्र, आता कधीही अवकाळी पावसाचे ढग (cloud) दाटायला लागतात. आताही दोन आठवडे वादळी पावसाची शक्यता महाराष्ट्रात (maharashtra) वर्तविण्यात आली असून, दोन आठवड्यांपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

उन्हाळी पिके धोक्यात!

अकोला जिल्ह्यासह वऱ्हाडात दोन वर्षांपासून उन्हाळी पिकांना चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) वार्षिक उत्पन्न वाढीची अपेक्षा वाढली होती. सध्या अकोल्यासह वऱ्हाडात मोठ्या प्रमाणात उन्हाळी पीक लागवड झाली आहे. मात्र, वादळी व अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

rain Maharashtra Weather forecast
धुक्यामधून आला लहान मुलांच्या ओरडण्याचा आवाज; पाहताच बसला धक्का
सक्रिय पश्‍चिम विक्षोभ म्हणजे, हाईयर लॅटिट्यूडला बर्फबारी सुरूच आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे इंटरमीडिएट झोनला सुरुवात झाली आहे. वातावरणात बदल, ऋतूबदल आणि पश्‍चिम विक्षोभ सक्रिय असल्याने दोन आठवडे राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com