“राष्ट्रवादीत जाणार का?”; उदयनराजेंनी दिले उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Udayanraje Bhonsle

“राष्ट्रवादीत जाणार का?”; उदयनराजेंनी दिले उत्तर

पुणे : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनी पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. अजित पवारांसोबत विकास कामांबाबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले.

हेही वाचा: 'Asaduddin Owaisi 'राष्ट्रवादी' नसले, तरी 'देशभक्त' आहेत'

वाईन विक्रीचा निर्णयावर बोलताना उदयनराजे म्हणाले, “प्रत्येकाचे वैयक्तिक जीवन असतं.प्रत्येक व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर काय करायचं आणि काय करायचं नाही, हे त्या व्यक्तिने ठरवायचे असते. ही लोकशाही आहे. लोकशाहीमधे निवडून दिलेले प्रतिनिधी याचे उत्तर देतील. राजेशाही असती तर मी उत्तर दिले असते.” सोबत तुम्ही राष्ट्रवादीत जाणार का, या प्रश्नावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, “शिवाजी महाराजांचे धोरण होते सर्वधर्म समभाव तसे माझे धोरण सुध्दा सर्व पक्षीय समभाव आहे.”

Web Title: Udayanraje Answered The Question On Going In Ncp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..