Vidhan Sabha 2019 : आठवले म्हणतात, 'आदित्यपेक्षा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी योग्य'

वृत्तसंस्था
Saturday, 12 October 2019

आदित्यला मुख्यमंत्री करण्यास शिवसेना तयार

- राजकारणात काहीही होऊ शकतं

मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरे यांच्याऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, असे मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगेन, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज (शनिवार) सांगितले.

मुख्यमंत्रिपदाबाबत रामदास आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, वरळी हा आमचा बालेकिल्ला आहे. सर्व आंबेडकरी मतांसह मराठी मतेही त्यांना मिळतील आणि आदित्य ठाकरे भरघोस मतांनी विजयी होतील. त्यामुळे आता आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतील, असे स्वप्न शिवसेनेने पाहावे. मात्र, सध्याचे चित्र पाहता देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे मला वाटते, असेही ते म्हणाले. 

आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आदित्य यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती निवडणूक लढवत आहे. तसेच युवासेनाप्रमुख असलेले आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील, असे शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे म्हणणे आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात; दिवाळीपूर्वी पगाराचा निर्णय रद्द

आदित्यला मुख्यमंत्री करण्यास शिवसेना तयार

आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यास शिवसेनेची तयारी आहे. आदित्य यांच्याबाबत आम्हाला, जनतेला सर्वांना आदर आहे. मात्र, एकदम ते मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतील, असे वाटत नाही. 

राजकारणात काहीही होऊ शकतं

राजकारणात कधी काहीही होऊ शकतं. शिवसेनेच्या जास्त जागा आल्या तर आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदासाठी नंबर लागू शकतो. पण अशावेळी आदित्य ठाकरेंचा नंबर लागण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे. 

'मातोश्री'वर आश्वासनांचा पाऊस; वचननाम्यात मात्र 'आरे'चा उल्लेख नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray more Capable than Aditya Thackeray for CM Post says Ramdas Athawale Maharashtra Vidhan Sabha