Uddhav Thackeray : ही तर भाजपची ‘सौगात ए सत्ता’, उद्धव ठाकरे यांची टीका

Saogat-e-Modi’ : भाजपने ‘सौगात ए मोदी’ कार्यक्रमांतर्गत ३२ लाख मुस्लिम कुटुंबीयांना भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहे. मात्र, हा कार्यक्रम निवडणुकीपूर्वीची सौगात नसून सत्ता मिळवण्यासाठीची योजना असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sakal
Updated on

मुंबई : ईदच्या निमित्ताने भाजपने ‘सौगात ए मोदी’ कार्यक्रम हाती घेतला आहे. ३२ लाख मुस्लिम कुटुंबीयांना घरोघरी जाऊन भेट दिली जाणार आहे. भाजपचा हा कार्यक्रम म्हणजे ‘सौगात ए मोदी’ नव्हे तर ‘सौगात ए सत्ता’ असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे) मुस्लिम मतदान झाल्याने आपल्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करणाऱ्या भाजपने हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com