Uddhav Thackeray : चिन्ह अन् पक्षाच नाव जाताच, ठाकरे गटाचा मोठा निर्णय; आता...

hearing on maharashtra power struggle  shivsena supreme court constitution bench Uddhav Thackeray vs Eknath shinde
hearing on maharashtra power struggle shivsena supreme court constitution bench Uddhav Thackeray vs Eknath shinde Sakal Digital

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्यानंतर उद्धव ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे.

hearing on maharashtra power struggle  shivsena supreme court constitution bench Uddhav Thackeray vs Eknath shinde
Eknath Shinde: निवडणुक आयोगाच्या निकालावर CM शिंदेंची यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत म्हणाले की, जो पक्ष बाळासाहेबांनी, लाखो शिवसैनिकांनी बलिदान देऊन मोठा केला. तो पक्ष ४० बाजारबुणगे विकत घेतात. यावर काय बोलावं, लोकशाहीवरचा विश्वास आज गमावला आहे.

देशातील सगळ्या स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. न्यायव्यवस्था देखील गुलाम असल्यासारखं वागत आहेत. ४० बाजारबुणगे हे पैशांच्या जोरावर पक्ष विकत घेत असतील सगळ्या व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे, असं राऊत यांनी म्हटलं.

hearing on maharashtra power struggle  shivsena supreme court constitution bench Uddhav Thackeray vs Eknath shinde
शिंदे गटाला शिवसेना पक्ष अधिकृतरित्या मिळाल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले खरी...

जे काही झाले ते सगळे दबाबातून झाले आहे. असे मला वाटते. निवडणूक आयोगावर माझा विश्वास नाही. जो निर्णय आला आहे तो विकत घेतलेला आहे. खोके सरकारने हे सगळे केले आहे. त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. आम्ही पुन्हा कायद्याची लढाई लढणार आणि नवी शिवसेना उभारणार, असं राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com