Uddhav Thackeray : " सभेत घुसणार? घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार"; उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांना इशारा!

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

जळगाव : शिवसेनेला आव्हान देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभा घेतली. छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव येथील सभांनंतर आता पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी हल्लाबोल केला.

शिवसेना कुणाची हे पाकिस्तानला विचारलं तर ते देखील सांगतील पण आमच्याकडील मोतीबींदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे कळत नाही. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल. पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखले नाही.

यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांना देखील टोला लगवाला आहे. सभेत घुसणार? म्हणतात. अशा घुशी आम्हीं खुप पाहिल्या आहेत. घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
अजितदादांच्या चर्चांमुळे शिंदे गटात झालेल्या अस्वस्थतेवर अंधारेंनी ठेवलं बोट, म्हणाल्या...

 “आम्ही दगडे मारून सभा बंद करणारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज करू नये”, असं थेट आव्हान आमदार गुलाबराव पाटील यांनी दिले होते. याचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला.

Uddhav Thackeray
Sushma Andhare : "...तेव्हाच आम्ही म्हणू राज ठाकरे सत्त्याचा वाली आहे" ; सुषमा अंधारे कडाडल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com