Ajit Pawar : भला मोठा पुष्पहार अन् डीजेच्या दणदणाटात अजितदादांचं शिंदेवाडीत स्वागत; आमदार पाटील बनले उपमुख्यमंत्र्यांचे 'सारथी'

आमदार मकरंद पाटील यावेळी अजित पवार यांच्या गाडीचे सारथी झाले.
Ajit Pawar visit Shindewadi
Ajit Pawar visit Shindewadiesakal
Summary

अजित पवार यांचा शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंच व महिलांनीही विशेष सत्कार केला.

शिरवळ : शिंदेवाडी (ता. खंडाळा) इथं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं भला मोठा पुष्पहार व डीजे लावून, फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं. यावेळी अजितदादांच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आली होती.

तसेच शरद पवार आल्यानंतर त्या गाडीत सारथी झालेले आमदार मकरंद पाटील यावेळी अजित पवार यांच्या गाडीचे सारथी झाले. आज सकाळपासून स्वागतासाठी शिंदेवाडी या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी अजितदादांच्या गाडीचे सारथी म्हणून पुढच्या दिशेनं प्रवास केला.

Ajit Pawar visit Shindewadi
Loksabha Election : 'भाजप-धजद युतीची अद्याप वेळ आली नाही'; कुमारस्वामींच्या वक्तव्याने खळबळ, BJP बॅकफूटवर?

यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. रामराजे हे गाडीतून उतरून स्वागत मंडपात स्वागतासाठी आले. दरम्यान, धनजंय मुंडे यांनी गाडीतच बसणं पसंद केलं. या प्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी करत, फुलांची उधळण करत अजित पवार यांचं स्वागत केलं.

Ajit Pawar visit Shindewadi
'स्वतःचं नाव धर्मनिरपेक्ष जनता दल ठेवलं आणि जातीवादी पक्षाशी हातमिळवणी केली'; BJP-JDS युतीवर मुख्यमंत्र्यांचा प्रहार

तसेच अजित पवार यांचा शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंच व महिलांनीही विशेष सत्कार केला. यावेळी शिरवळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, अजित पवारांचं आगमन झाल्यावर या गर्दीवर पोलिसांना नियंत्रण मिळवता आलं नाही. त्यामुळं त्यांची दमछाक झाली. आज कोल्हापुरात अजितदादांची सभा होत आहे.

Ajit Pawar visit Shindewadi
Sanatan Dharma Explained: सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com