esakal | फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन्याचे भाजपचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन्याचे भाजपचे संकेत

फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन्याचे भाजपचे संकेत

sakal_logo
By
प्रशांत बारसिंग

मुंबई :  भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करून भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली आगामी सरकार स्थापन करण्याचे संकेत दिले. विधानभवनातील भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात झालेल्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार, भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा यांचे आभार मानले. त्याच बरोबर त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही आभार मानले. ते म्हणाले, महायुती म्हणून निवडणूक लढलो. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले त्याबद्दल त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो असे फडणवीस म्हणाले.

सरकारकडे लोकांच्या 'आधार कार्ड' संबंधी 'ही' माहिती उपलब्धच नाही..
 

सत्तास्थापनात शंकेचे कुठलेही कारण नाही. ज्यांना शंका घ्यायची आहे ते चर्चा करत आहेत. आपण महायुती म्हणून मते मागितली, लोकांना सामोरे गेलो, लोकांनी बहुमताने निवडणून दिले आणि आता महायुतीचच सरकार येणार आहे यात कुणालाही शंका घेण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात सरकारने उत्तम काम केले. मात्र सर्वच आम्ही केले आणि ते झाले असा दावा आमचा नाही. राहिलेली काम पुढच्या पाच वर्षात पूर्ण करणार आहोत. सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांनी भाजपला मतदान केले आहे. सर्वच वर्गाचे प्रतिनिधित्व भाजपमध्ये आहे त्यामुळे भाजप हा सर्व सामान्यांचा पक्ष ठरला असल्याचे ते म्हणाले.

विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला आणि विविध पक्षांच्या 10 आमदारांनी त्याला अनुमोदन दिले.

का केला मोदींनी शरद पवारांना फोन ? 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील...

वसंतराव नाईक यांची टर्म 11 वर्षांची होती, त्यांचा रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. आज सर्वजण खूप आनंदात आहोत. राज्यात बिगर कॉंग्रेस सरकार पुन्हा आले. पाच वर्षे सलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टर्म पूर्ण केली. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा 11 वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस तोडतील. राज्यात सर्वाधिक जागा मिळलेला आपला पक्ष आहे. वयाचा आणि अनुभवाचा आदर आमच्याही मनात आहे. पण वस्तूस्थिती ही वस्तूस्थिती आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

दादा तुमच्यामुळे माझ्या चेहर्यावर हास्य - मुख्यमंत्री

कठीण परिस्थितीत तुमच्यासारखे सहकारी माझे चिलखत बनुन समोर उभे राहतात . त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हास्य कायम असते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बोलताना सांगितले.

सत्तास्थापनेसाठी 'शिवसेनेचा सिक्सर..' आता शिवसेनेने काय केलं ?
 

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये कोणत्याही प्रसंगात देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम असते असे विधान केले होते. त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमच्यासारखी सहकारी हे कठीण प्रसंगात माझ्यासमोर चिलखत सारखे उभे राहतात, त्यामुळे मला कुठली काळजी नसते आणि त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर हास्य असते.
महाराष्ट्रातील जनतेसमोर आपण महायुती साठी मते मागितली आणि जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलेले आहे . त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे . कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका . चर्चा करून विश्वास ठेवू नका. काळजी करू नका . महाराष्ट्रामध्ये महायुतीचे उत्तम सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

WebTitle : under leadershio of devedra fadanvis bjp and mahayuti might form government in maharashtra

loading image