Pune University Open Learning Admission : पुणे विद्यापीठात दूरस्‍थ पद्धतीने पदवी, पदव्‍युत्तरचे प्रवेश सुरू

Online-Admission
Online-AdmissionSakal

Pune Open Learning Admission : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या मुक्‍त व दूरस्‍थ अध्ययन प्रशाळेंतर्गत कला, वाणिज्‍य अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

इच्‍छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी ३० ऑगस्‍टपर्यंत मुदत असणार आहे. अर्ज दाखल केल्‍यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यास केंद्रात अर्ज जमा करायचे आहे. (University of Pune admission for degree post graduation through distance mode have started nashik news)

विद्यापीठाच्‍या स्कूल ऑफ ओपन लर्निंगअंतर्गत दूरस्‍थ पद्धतीने शिक्षणक्रमांना प्रवेश दिले जात असतात. ज्‍या विद्यार्थ्यांना विविध कारणांनी नियमित शिक्षण घेणे शक्‍य नसेल, महाविद्यालयात पूर्णवेळ देणे शक्‍य नसेल, त्‍यांना दूरस्‍थ पद्धतीतून शिक्षण सुरू ठेवण्याची संधी या माध्यमातून उपलब्‍ध करून दिली जाते.

त्‍यानुसार विद्यापीठाच्‍या मुक्‍त व दूरस्‍थ अध्ययन प्रशाळेंतर्गत बी. ए,. बी. कॉम. तसेच एम.ए., एम.कॉम. या दूरस्‍थ शिक्षण अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Online-Admission
YCMOU News : मुक्‍त विद्यापीठात शिक्षण अवघ्या 'इतक्या' रुपयांत! विद्यार्थ्यांना शुल्‍कात सवलतीची संधी

अर्ज जमा करताना आधारकार्ड, बारावी, पदवी किंवा अन्‍य आर्हतेसंदर्भातील गुणपत्रिका यांसह ॲकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडिटच्‍या नोंदणीची माहिती सादर करायची आहे.

महत्त्वाच्‍या तारखा अशा

- ऑनलाइन नावनोंदणी ः ३० ऑगस्ट

- प्रवेशअर्ज व शुल्‍क भरणे ः ३१ ऑगस्ट

- अभ्यास केंद्रावर अर्ज जमा करणे ः २ सप्‍टेंबर

Online-Admission
YCMOU Admission : ‘मुक्‍त’च्‍या प्रवेशासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ; अभ्यासकेंद्र मान्‍यतेसाठी 26 पर्यंत मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com