काँग्रेस कमकुवत होतेय, आम्ही मजबूत पक्षांसोबत जातोय - नवाब मलिक

Nawab Malik Criticized Congress On UP Election 2022
Nawab Malik Criticized Congress On UP Election 2022sakal media

मुंबई : येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका (UP Assembly Election 2022) पार पडत आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील पक्षांनी देखील सहभाग घेतला आहे. राष्ट्रवादी (NCP) समाजवादी पक्षासोबत (SP) मिळून ही निवडणूक लढणार आहे. पण, महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी असलेली राष्ट्रवादी उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत का गेली नाही? याबाबत पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Nawab Malik Criticized Congress On UP Election 2022
पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढणार - शरद पवार

भाजपला उत्तर प्रदेशमध्ये खूप अहंकार होता. पण, तो आता संपला आहे. भाजप नेत्यांच्या राजीनाम्याच्या सत्रावरून हे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीने अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये चर्चा होणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न? -

मलिकांनी उत्तर प्रदेश निवडणुकीवरून काँग्रेसवर टीका देखील केली. ''९० च्या दशकानंतर काँग्रेस कमकुवत झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील तेच चित्र आहे. त्यामुळे आम्ही मजबूत पक्षासोबत जाणार आहोत, असं म्हणत मलिकांनी काँग्रेस नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच उत्तर प्रदेशात काँग्रेसला आमच्यासोबत यायचे असेल तर येऊ शकतात. कारण, आम्हाला भाजपला हरवायचे आहे', अशी ऑफर देखील त्यांनी काँग्रेसला दिली.

उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेल स्वबळावर लढायचं आहे, तर आम्ही काहीही करू शकत नाही. पण, कोणाला सोबत घ्यायचं हा अधिकार आम्ही अखिलेश यादव यांना दिला आहे. त्यांनी विचार केला तर इतर पक्षांना सोबत घेऊ शकतात, असंही मलिक म्हणाले.

गोव्यात तीन्ही पक्षांनी एकत्र लढायला पाहिजे -

गोव्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. गेल्यावेळी आम्ही काँग्रेससोबत होते. पण, काँग्रेसने भूमिका घेतली असती तर भाजप सत्तेत नसता. हेच राजकारण अजूनही सुरू आहे. व्यक्ती छोटा असतो आणि पक्ष मोठा असतो. अजूनही शिवसेना, काँग्रेस आणि आम्ही एकत्र लढायला पाहिजे. आमची तयार आहे. पण, काँग्रेस ते मान्य करायला तयार नाही, असंही मलिक म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com