
लसीचा इफेक्ट नऊ महिन्यांपर्यंतच! राज्यातील साडेसात कोटी व्यक्ती सुरक्षित
सोलापूर : चीन, युरोप, दक्षिण कोरियात या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना अर्लट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 12 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत. दरम्यान, आतापर्यंत राज्यातील सात कोटी 49 लाख व्यक्ती दोन्ही डोस घेऊन कोरोनापासून सुरक्षित झाल्या आहेत. लसीचा इफेक्ट नऊ ते दहा महिन्यांपर्यंत असून दोन डोस घेऊन ज्यांचे नऊ महिने पूर्ण झालेत, त्यांनी बुस्टर (संरक्षित) डोस घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हेही वाचा: कोंडीजवळील अपघातात सहाणांचा मृत्यू! जखमीतील दोघांचा आज मृत्यू
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कडक लॉकडाउन तर दुसऱ्या लाटेत कडक निर्बंध लागू केले गेले. तिसऱ्या लाटेतही निर्बंध लागू झाले. पण, आता पुन्हा लॉकडाउन, निर्बंध लागू करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारी बाब नाही. त्यामुळे प्रत्येकांना 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' म्हणून लस घेऊन स्वत:सह कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित करावे लागणार आहे. जानेवारी 2021 पासून प्रतिबंधित लसीकरण सुरु झाले. मोफत लस देऊनही सद्यस्थितीत दीड कोटी व्यक्ती लसीकरणापासून दूरच आहेत. त्यांना कोरोनाचा धोका सर्वाधिक असणार आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्या तथा एकही डोस न घेतलेल्यांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, लस टोचलेल्यांनी कोरोना होणारच नाही, या अविर्भावात न राहता कोरोनाचे नियम पाळावेत. ज्या भागात सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत, त्याठिकाणचा स्वतंत्र सर्व्हे करून त्यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.
हेही वाचा: सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! महिलांना 'भरोसा' अन् 'शक्ती'ही मिळेना
लसीकरणाची सद्यस्थिती...
18 वर्षांवरील व्यक्तींचे टार्गेट
9,14,35,000
पहिला डोस घेतलेले
8,83,0087
दुसरा डोस घेतलेल
7,19,70,948
लस शिल्लक
80,00000
हेही वाचा: एक मुलगी, अनेकांसोबत जमविले विवाह! सांगोला, साताऱ्यातील तरुणांना फसवणारे जेरबंद
सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत
जगातील काही देशांमध्ये कोरोना पुन्हा वाढतोय. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. लस घेतल्यानंतर प्रत्येकजण सुरक्षित होऊ शकतो. लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ ते दहा महिने झालेल्या 40 वर्षांवरील सर्वांनी बुस्टर डोस घ्यावा.
- डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा आरोग्याधिकारी, सोलापूर
हेही वाचा: झेडपीच्या 43 शाळांना लागणार टाळे? कोरोनामुळे ढासळली 'प्राथमिक' गुणवत्ता
प्रत्येक लसीचे निकष...
1) कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा
2) कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस किमान 28 दिवसांनी घेणे आवश्यक
3) कोर्बोवॅक्स लसीचा पहिला डोस घेऊन एक महिना पूर्ण झालेल्यांनी दुसरा डोस घ्यावा
4) लसीमुळे दहा महिन्यांपर्यंत शरीरात राहते रोगप्रतिकारकशक्ती; त्यानंतर बुस्टर डोस आवश्यकच
Web Title: Vaccine Effects Last Up To Nine Monthsseven And A Half Crore People In The State Are
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..