Vidhan Sabha 2019 : महादेव जानकर हे तर मोठे पाकिट प्लेअर; पाहा कोणी केला आरोप?

टीम ई-सकाळ
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

परभणी : भाजपचा मित्र पक्ष असेलल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे ‘मोठे पाकीट प्लेअर’, आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. मधूसूदन केंद्रे यांनी केली आहे. 

परभणी : भाजपचा मित्र पक्ष असेलल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे ‘मोठे पाकिट प्लेअर’, आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. मधूसूदन केंद्रे यांनी केली आहे. डॉ. केंद्रे सध्या परभणीतील गंगाखेडचे आमदार असून, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचे मेहुणे आहेत.

काय म्हणाले डॉ. केंद्रे?
मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाची दिशाभूल करून मित्रपक्षाला नावापूरत्या जागा देऊन महायुती केली आहे, असे मत आमदार डॉ. केंद्रे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘राष्ट्रीय समाज पक्षाला जिंतूर आणि दौंडची जागा मिळाली असताना तेथील उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. युतीत गंगाखेडची जागा शिवसेनेला सुटलेली असतांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दहा मिनिटं अगोदर रासपचा एबी फॉर्म येतोच कसा?, असा प्रश्न डॉ. केंद्रे यांनी उपस्थित केला आहे. त्याचवेळी महादेव जानकर हे मोठे पाकिट प्लेअर आहेत, अशी टीकाही डॉ. केंद्रे यांनी केलीय.

होय मी, सत्तेसाठी युती केली; उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत

शिवसेनेचेही नाराजी
डॉ. केंद्रे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत महायुती ही दिशाभूल आहे. शिवसेनेचे आमदार पाडण्यासाठीच हे केलं जात आहे.’ गंगाखेड मतदारसंघात शिवसेनेचे विशाल कदम आणि रासपचे रत्नाकर गुट्टे यांनी अधिकृत एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यातच आमदार केंद्रे यांनी महादेव जानकर हे मोठे पाकीट प्लेअर असल्याचा घाणाघात करून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. आपण हा आरोप जबाबदारीने करीत असल्याचेही केंद्रे यांनी सांगितले. गंगाखेडची जागा शिवसेनेला सुटली असताना रासपने सदर जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करायची गरज नव्हती, असं सांगत परभणीचे खासदार संजय जाधव यांनीही पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती.
 

आमदार प्रणिती शिंदे पायी देवीची दर्शनाला

महादेव जानकर नाराज
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर नाराज आहेत, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. आज, महादेव जानकर आपल्या पक्षातील नेत्यांची चर्चा करून, त्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती आहे. जानकर काय म्हणतात? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 ncp leader dr. madhusudan kendre statement mahadev jankar