Vidhan Sabha 2019 : पवारांचे नातू रोहित पवार यांची 'एवढी' आहे संपत्ती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना रोहित पवार यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे.

मुंबई : शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना रोहित पवार यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे.

रोहित पवार यांची संपत्ती-
रोहित पवार यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची एकूण संपत्ती २७ कोटी ४४ लाख २९ हजार २०० रुपये एवढी असल्याचे सांगितले आहे. त्यांची  स्थावर मालमत्ता २३ कोटी ९९ लाख २९ हजार २०० रुपये एवढी आहे. रोहित पवार यांच्याकडे वडिलोपार्जित ३ कोटी ४५ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांची संपत्ती किती?

रोहित पवार यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात रोहित यांनी त्यांच्या बँक खात्यात २,७५,३१,०३४ रुपये असल्याचे सांगितले आहे. तर त्यांनी बॉन्ड, डिबेनचर्स आणि शेयर्समध्ये ९ कोटी ६५ लाख ११ हजार ७१ रुपयांची गुंतवणूक केली आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट आणि विम्यामध्ये रोहित पवार यांचे ५७ लाख ०७ हजार ०२९ रुपये आहेत. रोहित पवार यांच्याकडे ११ लाख ९२ हजार ३१९ रुपयांची गाडी आहे. तर ११ लाख २१ हजार ७३२ रुपयांचं सोने आणि ४७ हजार ७ रुपयांची चांदी, १ लाख ६८ हजार रुपयांचे हिरे आणि ४ लाख ५२ हजार ४२० रुपयांचे इतर दागिने असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. तर, रोहित पवार यांच्याकडे विविध कंपन्यांची घड्याळे असून या घड्याळांची अंदाजे किंमत २८ लाख ९१ हजार ९२८ रुपये असल्याचं रोहित पवार यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती?

दरम्यान, रोहित पवार यांच्यापुढे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या राम शिंदे यांचं आव्हान आहे. राम शिंदे हे मंत्रिमंडळात विद्यमान मंत्री असून दहा वर्षापासून ते या मतदारसंघात आमदार आहेत. रोहित यांना ही निवडणूक सोपी नक्कीच नसल्याची चर्चा सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात असली तरी मागील काही दिवासांपासून रोहित हे मतदारसंघात तळ ठोकून आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांनी माझी शिकार करून दाखवाच असे आव्हानही दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 NCP leader Rohit pawar property karjat jamkhed nomination