Vinayak Mete : मेटेंच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या गाडी मालकाचा चौकशीत महत्त्वपूर्ण खुलासा

MLA Vinayak Mete Accident Death
MLA Vinayak Mete Accident Deathesakal

Vinay Mete Death Investigation Update : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात असून, तीन ऑगस्ट रोजी मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणारी गाडी आणि त्याच्या मालकाला काल रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान गाडी मालकाने महत्त्वपूर्ण अशी माहिती पोलिसांना दिली आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याने घाईगडबडीने जात होतो तसेच आपण मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला नसून, तीन ऑगस्टचा पाठलाग केवळ गैरसमजातून झाला आहे, असे गाडी मालक संदीप वीर यांनी जबाबा म्हटले आहे, अशी माहिती रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली आहे.

MLA Vinayak Mete Accident Death
'पन्नास खोके एकदम ओके'नंतर जाणून घ्या, दुसरा दिवस कोणत्या मुद्द्यांवर गाजणार

वाढदिवसाला घाईगडबडीत जात असल्याने मेटेंच्या गाडीला ओव्हर टेक केल्याचंही वीर यांनी पोलीस चौकशीत सांगितले आहे. मेटेंच्या अपघाती निधनानंतर तीन ऑगस्टला त्यांच्या गाडीचा काही गाड्यांनी पाठलाग केला होता असा धक्कादायक खुलासा शिवसंग्रमच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यानंतरया घटनेला वेगळे वळन लागले होते. त्यानंतर पोलिसांनी तीन तारखेला पाठलाग करणाऱ्या गाडीसह त्याच्या मालकाला रांजणगाव पोलिसांनी काल ताब्यात घेतले होते. त्यानंतर मेटेंच्या गाडीचा अपघात केल्याचा प्रकार गैरसमजातून असून, सीसीटीव्हीमध्ये जे दिसतय तो गैरसमज आहे असेही वीर यांनी पोलीस चौकशीमध्ये सांगितलं आहे.

MLA Vinayak Mete Accident Death
Vinayak Mete Death : विनायक मेटे यांचा अपघात कसा झाला; नेमकं काय घडलं? VIDEO

पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी सांगितले की, मेटेंच्या गाडीचा एका एर्टिगा कारने पाठलाग केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर संबंधित कार रांजणगाव हद्दीतील असल्याने कार मालक आणि गाडीतील इतर लोक स्वतः पोलीस स्टेशनला आले. त्यावेळी त्यांचा जबाब नोंदवला असता गाडी मालक वीर यांनी सांगितले की, तीन ऑगस्ट रोजी त्यांचा चुलत भाऊ दादासाहेब वीर याचा वाढदिवस होता. त्यामुळे ते घाईघाईने निघाले होते. यावेळी त्यांनी काही गाड्यांना ओव्हर टेक केलं. यामध्ये त्यांनी मेटेंच्या गाडीलाही ओव्हर टेक केलेलं असू शकतं. मात्र, चौकशीमध्ये त्यांनी मेटेंच्या गाडीचा पाठलाग केल्याचे आढळून आलेले नाही.

MLA Vinayak Mete Accident Death
ज्योती मेटेंना राज्यपाल कोट्यातून आमदार करा; राष्ट्रवादीची मागणी

घटनेची होणार सीआयडी चौकशी

शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत. मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com