esakal | विमानतळाच्या नावाखाली नारायण राणेंचा जमीन हडपण्याचा प्रयत्न; राऊतांचा पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

'विमानतळाच्या नावाखाली नारायण राणेंचा जमीन हडपण्याचा प्रयत्न'

'विमानतळाच्या नावाखाली नारायण राणेंचा जमीन हडपण्याचा प्रयत्न'

sakal_logo
By
स्नेहल कदम

रत्नागिरी - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज उद्घाटन होत आहे. या लोकार्पण सोहळ्यात एकमेकांचे राजकीय वैर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकत्र दिसणार आहेत. विमान उद्घाटनासाठी राणे समर्थकांनी केलेल्या पोस्टरबाजीला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पलटावार केला आहे. विमानतळाच्या नावाखाली ९३४ हेक्टर जमीन हडपण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर हल्लाबोल करू नये असा पलटवार त्यांनी राणे यांच्यावर केला आहे.

हेही वाचा: Chipit Airport: उद्घाटनाआधी राणेंचे वैभव नाईकांवर कॉन्ट्रॅक्टवरुन आरोप

ते म्हणाले, प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधींची भूमिका बजावणारा आम्हा सर्वांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. आमच्या प्रतिनिधींच्या श्रमाचे फळ मिळाल्याचा आनंद आहे. शिवसेनेला पोस्टरबाजी करण्याची गरजच नाही. नारायण राणे यांनी अनेकवेळा विमान तळाचं भूमिपूजन करण्याचं काम केले. पण खर्‍या अर्थाने विमानतळाच्या कामाला सुरुवात 2016 पासून झाली आहे, आणि आता ते पूर्णत्वाला जात आहे. काचेच्या घरात राहणारे, जे भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबले आहेत त्यांनी इतरांवर आरोप करण्याचं धाडस करु नये. शिवसेनेने आणि महाविकास आघाडीने मागच्या दोन वर्षांत सिंधुदुर्गात ज्या पद्धतीने काम केले आहे या कामांचा केव्हाही आम्ही पंचनामा करायला तयार आहोत. याबाबत आम्हाला घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Chipi Airport: 'नारायण मला तुझा अभिमान आहे असेच बाळासाहेब म्हणाले असते'

loading image
go to top