
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले हे बीडच्या जेलमध्ये आहेत. याच जेलमध्ये आठवले गँगचेही आरोपी आहे. आठवले गँगवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मकोका दाखल झाला होता.
वाल्मिक कराडने आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये फसवलं आणि पुन्हा वाचवल्याचा बनाव केला, अशी पोस्ट सनी आठवलेने केली होती. त्यानंतर सनी आठवले आणि त्याच्या गँगवर मकोका दाखल झाला होता.