

Maharashtra Weather Update
ESakal
मुंबई : राज्यात एकीकडे प्रचंड उष्णता तर दुसरीकडे अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विदर्भात दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली आहे. हवामान विभागाने देखील विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट प्रदेशावर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामानातील या असामान्य बदलाचा नागरिकांवर दुःखद परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.