Weather Update: कोकणासह मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता; तर राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. तर काही भागामध्ये उष्णतेचा कहर दिसून येत आहे.
Weather Update
Weather UpdateEsakal

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. तर काही भागामध्ये उष्णतेचा कहर दिसून येत आहे. दरम्यान हवामान विभागाने राज्यात पुण्यासह १२ जिल्ह्यांमध्ये आज शनिवारी (ता. २०) हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा यात समावेश आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक तापमान अकोल्यात ४४ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.

Weather Update
रक्तातील नातेच उठले जिवावर! सोलापूर जिल्ह्यात सव्वादोन वर्षांत सोलापूर शहरात 25 तर ग्रामीणमध्ये 139 खून; मालमत्ता, चारित्र्यावर संशय व अनैतिक संबंधातून सर्वाधिक गुन्हे

मराठवाडा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून कर्नाटक, दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. येत्या शनिवारी (ता. २०) मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update
शालेय शिक्षण विभागाचा नवा आदेश! तापमान वाढीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीचे बंधन नाही; शिक्षकांना मात्र सकाळी ७.३० ते ११.३० उपस्थिती बंधनकारक

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली.

तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट दिसून येते आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे.

Weather Update
‘MPSC’च्या हजारो विद्यार्थ्यांची व्यथा! 3 परीक्षांचे वेळापत्रक तर 3 परीक्षांचे निकाल प्रलंबित; ‘PSI’ची शारीरिक चाचणीही लांबणीवर; वयोमर्यादा संपण्याला जबाबदार कोण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com