WhatsApp ठरतंय शाळा मुल्यांकनाचं सर्वोत्तम माध्यम, सर्व्हेतून समोर आली माहिती

online
onlinee sakal

नागपूर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हाट्सअ‌ॅप हे माध्यमिक शाळांच्या मुल्यांकनामध्ये लोकप्रिय ठरत असल्याचे राज्य शिक्षण विभागाच्या एक सर्व्हेमधून समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेद्वारे राज्यातील १३ हजार विद्यार्थ्यांवर एक ऑनलाइन सर्व्हे करण्यात आला. त्यामधून असे समोर आले की, शाळा व्हॉट्सअ‌ॅपशिवाय घरगुती भेट, ऑफलाइन चाचणी आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे चाचण्या करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, यापैकी ९५ टक्के शाळा या मुल्यांकनासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करत असल्याचे सांगितले.

online
मुंबई, पुण्याच्या तुलनेत नागपूरची आघाडी; आरोग्य यंत्रणेत सुधारणा

शिक्षक अभ्याक्रमाचे फोटो, पीडीएफ आणि व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‌ॅपवर पाठवतात. त्यानंतर विद्यार्थी ते सोडवून त्याचे फोटो काढून परत शिक्षकांना पाठवतात. तसेच परीक्षा देखील अशाच घेतल्या जातात. इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म हे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असेलच असे नाही. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे व्हॉट्सअ‌ॅप असणे हे काळात स्वाभाविक आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यासाठी इतर माध्यमं कमी प्रमाणात वापरले जातात.

साधारण किती शाळा ऑनलाइन शिक्षण आणि मुल्यांकन करू शकतात, हे आम्हाला तपासून पाहायचे होते. ज्या शाळांनी ऑनलाइन परीक्षा घेतल्या नाहीत ते येत्या नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्यानंतर ऑफलाइन चाचण्या घेऊ शकतात. मात्र, असे काही बंधन नाही. आपल्याकडे मराठी आणि हिंदी मीडियमध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत, जे लॅपटॉप आणि मोबाईलचा खर्च करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची ऑफलाइन परीक्षा घेतली तरी हरकत नाही, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

online
गडचिरोलीत पोलिस-नक्षल चकमक : C60 जवानांनी दोन नक्षल्यांना घातले कंठस्नान

ऑनलाइन शिक्षणाची पद्धती ही प्रत्येक शाळांनुसार बदलत असते. काही शाळा या वेब कॅमचा वापर करून शिकवत असतात तर काही स्क्रिन शेअर करतात, तर काही लाईव्ह व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांना शिकवत असतात. याबाबत बोलताना एका मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापकाने सांगितले की, 'पैशामुळे सर्व गोष्टी शक्य होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक सुविधा पुरविल्या जाऊ शकतात. मोठ्या शाळा या कोणत्या गोष्टींची गरज आहे हे फक्त विद्यार्थ्यांना सांगतात. त्यानुसार त्यांचे पालक त्या सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र, मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये हे शक्य नाही. त्यामुळे ज्या सुविधा आहेत त्यांचाच वापर आम्ही करत असतो.'

गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये शिक्षक हे घरोघरी जाऊन मुल्यांकन करत असतात. तसेच विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी देखील हे शिक्षक घरोघरी जात असतात, असेही या सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

(टीप - सदर वृत्त हे टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानं दिलेलं आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com