
Maharashtra Din : महाराष्ट्राच्या निर्मितीचं श्रेय काँग्रेसवाले इंदिरा गांधींना का देतात ?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशात भाषेच्या आधारे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली. वास्तविक अनेक राज्ये "राज्य पुनर्रचना कायदा" 1956 अंतर्गत निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले.
त्याच वेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमिळ भाषेच्या लोकांना तामिळनाडू राज्य मिळाले. पण मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. त्यामुळे वेगळ्या राज्यांसाठी त्यांची मागणी जोर धरत होती.
याच दरम्यान 1 मे 1960 ला महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे आणि राज्य म्हणून अस्तित्वात आले आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण तुम्हाला माहितीये का की काँगेस आजही महाराष्ट्र निर्मितीचे श्रेय इंदिरा गांधींना देतात? यामागे बराच मोठा इतिहास आहे. (Why do Congress attribute to Indira Gandhi for foundation of Maharashtra)
इंदिरा गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या
स्वातंत्र्यानंतरच्या हा तो काळ होता जेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी इंदिरा गांधी या नेहरूंचा सांभाळ करत होत्या. त्यावेळी पंडित नेहरूंकडे येणारी कोणत्याही पत्र, आवेदन, मागणीचा इंदिरा गांधी तपशील तपासत असे. या दरम्यान इंदिरा गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनल्या. त्या वेळीच गुजराती आणि मराठी लोक स्वत:साठी वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करत होते.
या दरम्यान देशात अनेक आंदोलनेही झाली आणि या चळवळींचा आवाज ठेल नेहरूंपर्यंत पोहचला. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भाषिक वाद टाळण्यासाठी त्यांनी वेगळ्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या निर्मिती चा प्रस्ताव पारित करण्यात पाऊल उचलले.
इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई
व्दैभाषिक तोडण्याचा निर्णय करण्यांचं श्रेय त्या वेळीं लोकांनी इंदिरा गांधीना दिलं. एखादी समस्या हाताळायची त्यांची पद्धत ही निश्चयात्मक स्वरुपाची असे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या मागणीचा निर्णय त्यांनी केला होता.
इंदिरा गांधी त्या वेळीं काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष असतांना पक्ष-कार्यकारिणीत, इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्या अनेकदा मतभेद दिसून आले. जर महाराष्ट्र नी मुंबईसंबंधीचा प्रश्न येईल तेव्हा, मोरारजींचा विरोध होणार हें निश्चितच होतं, परंतु मोरारजींना बाजूला ठेवून, इंदिरा गांधी यांनी त्यांच्या विरोधावर युक्तीनं मात केली आणि अंतीम निर्णय केला. आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. यासाठी यशवंतराव चव्हाण आणि स.का.पाटील यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. हे पाहून मोरारजी देसाई यांना मोठा धक्काच बसला होता.
पं. नेहरू आणि पं. पंत यांनी या प्रश्नाचा पुनर्विचार करण्यांचं पूर्वीच ठरवलेंल असल्यानं त्यांचा विरोध होण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे इंदिरा गांधी यांना निर्धारानं पावलं टाकण्यास अडचण पडली नाही.आणि अखेर 1 मे आणि 1960 ला स्वतंत्र महाराष्ट्र उदयास आले.