

Ladki Bahin scheme
ESakal
मुंबई : महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबत सुरू असलेल्या बातम्यांवर एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, या योजनेअंतर्गत कोणत्याही पात्र महिलेचा अर्ज नाकारण्यात आलेला नाही. मोठ्या संख्येने अर्ज नाकारण्यात आल्याच्या वृत्तांनंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.