महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ

देशासह महाराष्ट्रात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ
Rape on Women
Rape on Womenटिम ई सकाळ

पुणे – देशासह महाराष्ट्रात बलात्काराच्या घटनांमध्ये (Rape cases) वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच काही दिवसांपुर्वी पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेवर पुणे (Pune) शहरातील दोन प्रतिष्ठित व्यावसायिकांनी लैंगिक अत्याचार (rape) केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी या दोन व्यावसायिकांना अटक केली.

कोरेगाव पार्क परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. आरोपींनी लैंगिक छळ करून याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप या महिलेने केला होता. ही महिला एका खासगी कंपनीत कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करते.

Rape on Women
नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर; घडामोडींना वेग!

मुळात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पून्हा ऐरणीवर आलाय. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत एका वीस वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. अशा अनेक बलात्काराच्या घटना दरदिवशी महाराष्ट्रासहित देशात उघडकीस येतात. अशा घटनेस आळा घालण्यासाठी तेथील स्थानिक प्रशासनाने योग्य पावले उचलणे गरजेचे आहे, तरच महिला सुरक्षित राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com