Pandharpur : पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको, असं म्हणत तरुणाची आत्महत्या

शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही असा व्हिडिओ त्याने चित्रीकरण केला आहे.
Suraj Jadhav
Suraj JadhavSakal Digital
Summary

शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही असा व्हिडिओ त्याने चित्रीकरण केला आहे.

पंढरपूरमध्ये तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याच्या (जन्माला पुन्हा कधी येणार नाही असं म्हणत त्याने आत्महत्या केली आहे. सूरज जाधव असं या शेतकऱ्याचं नाव आहे. आत्महत्या करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. (Pandharpur Farmer Suicide)

Suraj Jadhav
महावितरणची वीज तोडणी मुक्या जनावरांच्या जीवावर, शेतकरीही अडचणीत  

सूरज हा पंढरपूर येथील मगरवाडी गावातील शेतकरी होता. वीज तोडणी आणि महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून सूरजने विषप्राशन करून आत्महत्या केली. सूरजने विषप्राशन करतानाचा व्हिडिओ तयार केला असून हा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत सूरज म्हणतो, "शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही. गेम इज ओव्हर. आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं. इथून पुढं आयुष्य नाही. कारण शेतकरी नामर्द आहे. सरकारही शेतकऱ्यांचा विचार करणार नाही. जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत सरकार नाही." (Farmer Suraj Jadhav Video)

Suraj Jadhav
कोल्हापूर - जिल्ह्यात ठिकठिकाणी 'स्वाभिमानी'कडून चक्काजाम

दरम्यान, आता या आत्महत्येवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे सगळे प्रश्न घेऊन गेले बारा दिवस मी कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं आहे. पण या मुर्दाड राज्यकर्त्यांना आणि सरकारला जाग येत नाही. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की, असा कोणताही टोकाचा निर्णय घेऊन तुम्ही असे पाऊल उचलु नका. काय करायचंच असेल तर शेतामध्ये रात्री अपरात्री येणारे साप पकडून यांच्या कार्यालयामध्ये सोडून द्या, असेही त्यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com