
Panchayat Elections Becoming Tougher Due to High Costs
Esakal
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत पण राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला आहे. स्थानिक पातळीवरचे कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि यात होणाऱ्या खर्चाबाबत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठं विधान केलंय. या निवडणुकीत इतका खर्च होतो की कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो असंही ते म्हणालेत.