शबाना आझमींनी पोस्ट केला भीषण वास्तव दाखवणारा फोटो, ट्विटरवर चर्चेला उधाण

Friday, 26 June 2020

 फोटो पोस्ट केल्यामुळे सोशल मिडीयात शबाना आझमी यांच्यावर टीका केली जात आहे.

प्रसिध्द बॉलिवुड अभिनेत्री शबाना आझमी या सोशल मिडायावर त्यांच्या बेधडक मत व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जातात. त्या नेहमी वेगवेगळ्या सामाजिख प्रश्नांवर स्वतःची मते व्यक्त करत आल्या आहेत. नुकतेच शबाना आझमी यांनी त्यांच्या ट्विटर वरुन एक भावनिक भीषण वास्तव फोटो पोस्ट केला आहे. त्यावरुन ट्विटरवरती जोरदार चर्चा पेटली आहे.

या फोटोमध्ये आर्थिक परिस्थीती  कमजोर असलेले काही लोक रस्त्याच्या कडेला टाकलेल्या पाईपमध्ये बसलेले दिसत आहेत. हा फोटो पोस्ट केल्यामुळे सोशल मिडीयात शबाना आझमी यांच्यावर टीका केली जात आहे. 

आडनावामुळे बॉलिवुडमध्ये मिळालं नाही चांगलं काम! अभिनेत्याने केला खुलासा

शबाना आझमी यांनी आर्थिक गरीबीत जगणाऱ्या लोकांचा फोटो ट्विटरवर पोस्ट करताना “पावसाळा आला आहे.” अशा आशयाची कॉमेंट त्यांनी या फोटोवर केली आहे. त्यासोबतच त्यांनी रडणारी इमोजी देखील त्यांनी वापरली आहे. या वास्तव दाखवणाऱ्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भरपूर कमेंट येत आहेत. बऱ्याच जणांनी या फोटोवर स्वतःची प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.

 

‘या’ तारखेला होणार सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ प्रदर्शित

ज्या कमेंट येत आहेत त्यामध्ये बरेच जण सरकारणे अशा लोकांची मदत करायला हवी अशी मागणी करत आहेत. तर काही लोक हा फोटो जूना असून बांग्लादेश येथील असल्याचे सांगीतले आहे. बांग्लादेशातील फोटो वापरुन आपल्या देशाला बदनाम करत असल्याचा आरोप देखील काहीजण करताना दिसत आहेत. तर काही जणांनी अशा रस्त्यांवर राहणाऱ्यां लोकांना स्वतःच्या घरात आश्रय देण्याचा सल्ला देखील दिला आहे. त्यासोबतच काही लोकांनी शबाना आझमी यांनी फक्त पावसाळ्याचा उल्लेख केला आहे देश किंवा जागेचा उल्लेख देखील नसल्याचे सांगीतले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Shabana azmi shares photo and wrote the monsoons have arrived