भानुप्रताप ठाकूर, नाव तर ऐकलचं असेल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh bachchan

भानुप्रताप ठाकूर, नाव तर ऐकलचं असेल?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - काही चित्रपट असे असतात की ते कितीही वेळा पाहिले तरी कंटाळवाणे वाटत नाही. त्या चित्रपटांचे खास वैशिष्ट्य असते. ते प्रेक्षकांना आपलसं करुन टाकतात. बॉलीवूडमध्ये असे काही चित्रपटांच्या बाबत सांगता येईल त्यांना प्रेक्षक गेल्या दोन दशकांहून अधिक काळ पाहत आले आहेत. त्या चित्रपटाविषयीच्या आठवणींना त्यांनी जपून ठेवलं आहे. आज आपण अशाच एका सुंदर चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. त्या चित्रपटाचे नाव आहे. सुर्यवंशम.(Sooryavansham) एका मनोरंजन वाहिनीवर हा चित्रपट नेहमीच सुरु असायचा. आठवड्यातून एकदा का होईना या सिनेमाचे संवाद प्रेक्षकांच्या कानी पडलेले असायचे. त्या चित्रपटाला आज 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. (22 Years Of Sooryavansham Amitabh Bachhan Film Box Office Later Became hit)

21 मे 1999 मध्ये इवीवी सत्यनारायण यांचा सुर्यवंशम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाचे लेखन विक्रमन यांनी केले होते. तर निर्माता म्हणून जी आदिशेषगिरी यांनी जबाबदारी पार पाडली होती. त्यात महानायक अमिताभ बच्चन, (Amitabh bachchan) सौंदर्या (saundarya) , जयसुधा (jaysudha) , कादर खान kadar khan) , अनुपम खेर (anupam kher) आणि रचना बॅनर्जी (rachan bannerji) यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये अमिताभ यांनी डबल रोल साकारला होता. त्यांच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर कौतूक केले होते. अमिताभ यांचा अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहिला होता.

गेल्या कित्येक वर्षांपासून एका मनोरंजन वाहिनीवर हा चित्रपट सातत्यानं दाखवला जात आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. टेलिव्हिजनवर सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला चित्रपट म्हणूनही सुर्यवंशमचे नाव घ्यावे लागेल. आता तर या चित्रपटातील संवाद, कलाकारांची चित्रपटातील नावंही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सुरुवातीला जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र टेलिव्हिजनवर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सुर्यवंशममधील गाणीही प्रेक्षकांना आवडली. अनु मलिक यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. त्यावेळी ७ कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 12.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

सुर्यवंशममध्ये दोन अभिनेत्रींनी अमिताभच्या पत्नीची भूमिका केली होती. सौंदर्यानं हिरा ठाकूरच्या पत्नीची तर जयसुधानं भानुप्रतापच्या पत्नीची भूमिका साकारली होती. सर्वात खास गोष्ट म्हणजे या दोन्ही अभिनेत्रींसाठी डबिंग अभिनेत्री रेखा यांनी केलं होतं. पहिल्यांदा सौंदर्याऐवजी पूजा बत्राला त्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. मात्र त्यावेळी तिनं विरासत साईन केला होता. त्यामुळे तिला हा चित्रपट करता आला नाही.

हेही वाचा: 'राणी बरोबरची लव स्टोरी भारीच होती'

हेही वाचा: "त्या घटनेनंतर कॅमेऱ्याचे फ्लॅश पाहिले तरी माझं रक्त खवळतं"

सौंदर्या ही प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेत्री त्या सिनेमात होती. तिचं अवघ्या वयाच्या 32 व्या वर्षी निधन झालं. एका प्लेन क्रॅश मध्ये तिला जीव गमवावा लागला होता. तिच्या जाण्यानं सर्वांना धक्का बसला होता. असं म्हटलं जात की, वडिलांच्या रोलसाठी अमिताभ आणि मुलाच्या रोलसाठी अभिषेक बच्चनला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र ते काही शक्य झालं नाही. शेवटी अमिताभ यांनीच दोन्ही भूमिका साकारल्या. ज्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हाच तो सोनी मॅक्सवरही प्रदर्शित झाला होता. तेव्हाच 100 वर्षांसाठी या चित्रपटाचे हक्क त्या वाहिनीनं खरेदी केले होते. त्यामुळे पुढील काळात देखील हा चित्रपट आपल्याला पाहता येणार आहे.

loading image
go to top