HBD श्रद्धा कपूर; लता मंगेशकर यांची नात, नेपोटिझम आणि बरंच काही

shradha kapoor
shradha kapoor

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री श्रध्दा कपूरचा आज 34 वा वाढदिवस आहे. मालदिवमध्ये श्रध्दा तिचा बर्थ डे सेलिब्रेट करत आहे. श्रद्धा भाऊ प्रियांकच्या लग्ना निम्मीत्त मालदिवला गेली आहे. यावेळी सोशल मीडियावर एका व्हिडिओमध्ये श्रद्धा 'स्त्री' या चित्रपटातील 'कमरिया' गाण्यावर डान्स करून बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसली. श्रद्धाचा जन्म 3 मार्च 1987 रोजी मुंबईमध्ये झाला. श्रद्धाचे वडील शक्ती कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेते आहेत. लहानपणी श्रद्धा आभ्यासात खूप हुशार होती. 12 वी मध्ये असताना श्रद्धाला 95 टक्के गुण मिळाले होते. श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापूरी आणि वडील शक्ती कपूरना असे वाटत होते की श्रद्धाने शैक्षणिक क्षेत्रात आपले करियर करावे. पण श्रद्धाला अभिनय क्षेत्रातच काम करायचे होते. शाळेत असताना श्रद्धा उत्तम फुटबॉल आणि हँडबॉल खेळाडू होती. 

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि श्रद्धामध्ये विषेश नाते आहे. श्रद्धाचे आजोबा लता मंगेशकरचे चुलत भाऊ आहेत. लता मंगेशकर आणि आशा भोसलेची श्रद्धा नात आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी ही श्रद्धाची मावशी आहे. आई आणि मावशी मराठी असल्यामुळे श्रद्धाला उत्तम मराठी बोलता येते.  

श्रद्धाने 'तीन पत्ती' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 'लव्ह का दी एन्ड' या चित्रपटात श्रध्दाने काम केले पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला यश मिळाले नाही. 2013 साली आलेल्या 'आशिकी' 2 या हिट चित्रपटातील अभिनयामुळे श्रद्धाला विशेष ओळख मिळाली. या चित्रपटातील अभिनयासाठी श्रध्दाला फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर श्रध्दाने बॉलिवूडमधील स्त्री, छिछोरे, एक व्हिलन, हैदर, एबीसिडी 2 या हिट चित्रपटांमध्ये काम केले. 

स्टार किड किंवा नेपोकिड म्हणून श्रद्धाकडे पाहण्याचा दृष्टीकोण प्रेक्षकांचा होता पण या सगळ्याकडे श्रद्धाने लक्ष दिले नाही. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फोलोवर्स असणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत श्रद्धाने तिसरे स्थान मिळवले आहे.आज तिच्या वाढदिवसा निम्मीत्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com