National Film Awards 2022: आशा पारेख, अजय देवगणचा आज राष्ट्रीय पुरस्कारानं सम्मान, वाचा विजेत्यांची यादी

नवी दिल्लीत ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा रंगणार असून राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
68th National Film Award Distribution on 30th september,2022, winners list, ceremony in New Delhi
68th National Film Award Distribution on 30th september,2022, winners list, ceremony in New DelhiGoogle

68 th National FIlm Awards: अखेर आज तो दिवस आला जेव्हा नवी दिल्लीत रंगेल ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा. ३० सप्टेंबर,२०२२ रोजी सिनेजगतातील मोठमोठ्या मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती दौपदी मुर्मू आपल्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सम्मान करतील. या पुरस्कारांसाठी विजेत्यांची निवड ही स्पेशल ज्युरी मार्फत केली जाते. (68th National Film Award Distribution on 30th september,2022, winners list, ceremony in New Delhi)

68th National Film Award Distribution on 30th september,2022, winners list, ceremony in New Delhi
निरागस चेहऱ्याची वादग्रस्त साऊथ ब्युटी तृषा कृष्णन...

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची घोषणा यावर्षी जुलै महिन्यात झाली. अभिनेता अजय देवगण आणि सूर्या यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविलं जाणार आहे. याच सोहळ्यात प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सम्मानित करण्यात येईल. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात साऊथ सिनेमांचा बोलबाला दिसणार आहे. यावेळी सूर्याचा 'सोरारई पोटारू' सिनेमाला उत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरविण्यात येईल. हा पुरस्कार सोहळा ३० सप्टेंबर रोजी म्हणजे आज संध्याकाळी ४ किंवा ५ च्या दरम्यान सुरु होईल.

68th National Film Award Distribution on 30th september,2022, winners list, ceremony in New Delhi
'तो पाकिस्तानी अभिनेता माझा..',अमिषा स्पष्टच बोलली

हे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांच्या २०२० मधील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणार आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर कोणी-कोणी आपलं नाव कोरलंय,चला पूर्ण यादीवर एक नजर टाकूया.

उत्कृष्ट अभिनेता- अजय देवगण(तानाजी), सूर्या(दाक्षिणात्य अभिनेता)

२. उत्कृष्ट हिंदी सिनेमा-तुलसीदास ज्युनियर

३. उत्कृष्ट अभिनेत्री-अपर्णा बालामुरली(Soorarai Pottru)

४. उत्कृष्ट सह-कलाकार(पुरुष)- बिजू मेनन(AK अय्यपनम कोशियुम)

५. उत्कृष्ट दिग्दर्शक-मल्याळम दिग्दर्शक सच्चिदानंदन केआर(अय्यपनम कोशियुम साठी)

६. उत्कृष्ट सह-कलाकार(स्त्री)- लक्ष्मी प्रिया चंद्रामौली(Lakshmi Priyaa)

७. स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड- बालकलाकार वरुण बुद्धदेव

68th National Film Award Distribution on 30th september,2022, winners list, ceremony in New Delhi
शाहिदचं 58 करोडचं नवं घर...एकदम जन्नत...

८.मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट- मध्ये प्रदेश

९.स्पेशल मेंशन स्टेट-उत्तराखंड आणि युपी

१०.बेस्ट रायटिग ऑन सिनेमा अॅवॉर्ड- द लॉन्गेस्ट किस(The Longest Kiss)

११. बेस्ट फिचर फिल्म- सोरारई पोटारू

१२. बेस्ट पॉप्युलर फिल्म-तानाजी

१३.उत्कृष्ट गायक (स्त्री)- Nanchamma (अय्यप्पनम कोशियुम साठी)

१४.उत्कृष्ट गायक(पुरुष)- राहुल देशपांडे( मी वसंतराव)

१५.उत्कृष्ट गीतकार- मनोज मुंतशिर(साइना)

१६. आशा पारेख- दादासाहेब फाळके पुरस्कार

68th National Film Award Distribution on 30th september,2022, winners list, ceremony in New Delhi
Drishyam 2 Teaser Out: हृदयाचे ठोके वाढवतोय 'दृश्यम 2' चा टीझर; ऐकला का विजयचा कबुलीजबाब?

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं प्रसारण एफ.एम.गोल्ड(रेडिओ वाहिनी),इंद्रप्रस्थ,AIR लाइव्ह न्यूज,आकाशवाणी AIR चे युट्यूब चॅनलवर केलं जाईल. या सोहळ्यात अजय देवगण,गायिका अपर्णा बालामुर्ली,गीतकार मनोज मुंतशिर, दिग्दर्शक मधुर भांडारकर सारखे दिग्ग्ज सामिल होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com