Drishyam 2 Teaser Out: हृदयाचे ठोके वाढवतोय 'दृश्यम 2' चा टीझर; ऐकला का विजयचा कबुलीजबाब? Drishyam 2 Teaser | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'Drishyam 2' Recall Teaser Out, murder mystery

Drishyam 2 Teaser Out: हृदयाचे ठोके वाढवतोय 'दृश्यम 2' चा टीझर; ऐकला का विजयचा कबुलीजबाब?

Drishyam 2 Teaser Out: अभिनेता अजय देवगण,श्रिया सरन आणि तब्बू यांच्या 'दृश्यम' सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं. सिनेमाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता लोक त्याच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा करतायत. काही दिवस आधीच सिनेमाच्या साऊथ व्हर्जनचा दुसरा भाग रीलिज झाला होता. त्यानंतर हिंदी व्हर्जनच्या मागणीनं जोर धरलेला दिसून आला.

तर आता प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण व्हायला जातेय,कारण कालच 'दृश्यम २' चा फर्स्ट लूक रीलिज झाला आणि आज सिनेमाचा टीझर लोकांच्या भेटीला आला. 'दृश्यम २' च्या रीकॉल टीझरमध्ये दाखवलेली सिनेमाची झलक हृद्याचे ठोके मात्र वाढवतेय.('Drishyam 2' Recall Teaser Out, murder mystery)

हेही वाचा: Drishyam 2: हत्यार हातात घेऊन उभा दिसला विजय साळगावकर,'दृश्यम 2'च्या फर्स्ट लूकची हवा

'दृश्यम २' च्या रीकॉल टीझरमध्ये एकीकडे सिनेमाच्या पहिल्या भागाविषयी माहिती दिली जातेय तर दुसरीकडे टीझरच्या शेवटी फक्त अजय देवगणचा लूक दाखवलाय जो सिनेमाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता वाढवून जातो ते एका हिंटमुळे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की दुसऱ्या भागात अजय देवगणचा लूक पूर्ण वेगळा दिसतोय आणि तो म्हणतोय,''माझं नाव विजय साळगावकर आणि हा माझा कबुलीजबाब!''

'दृश्यम २' चा हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आणि त्यामुळे आता प्रेक्षकांना देखील सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताच सिनेमाचा पोस्टर रिलीज केला गेला होता. 'दृश्यम २' १८ नोव्हेंबर,२०२२ रोजी सिनेमागृहात दाखवला जाईल. सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक पाठकने केलं आहे.

हेही वाचा: Agnihotri Beef Video: 'गोमांस खाल्लं की नाही?',अग्निहोत्रींनी केला हैराण करणारा दावा

'दृश्यम'ला जिथे प्रेक्षकांसोबतच समिक्षकांनीही गौरवलं होतं, तिथे दुसरीकडे सिनेमातील सीन्सही मीम्सच्या माध्यमातून तुफान हीट झाले होते. दोन आणि तीन ऑक्टोबरवरचं मीम तर आजही व्हायरल होताना दिसतं. तर सिनेमातील पाव भाजी आणि सत्संग यांच्यावरचे मीम्सही आज पहायला मिळतात. चाहत्यांना आशा आहे की 'दृश्यम २' पहिल्या भागापेक्षा चांगला असेल. पहिल्या भागात स्टोरी जिथे संपली होती, दुसऱ्या भागात ती तिथून पुढे सुरु होताना दिसणार आहे. मर्डर मिस्ट्री अधिक रंजक बनलीय दुसऱ्या भागात.