73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'घात' या मराठी चित्रपटाला वर्ल्ड प्रीमियरचा सम्मान..

जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची आडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम हे कलाकार 'घात' या चित्रपटात आहेत.
Ghaath Movie world premier in 73rd Berlin International Film Festival
Ghaath Movie world premier in 73rd Berlin International Film FestivalGoogle

73rd Berlin International Film Festival: प्लॅटून वन फिल्म्स या फिल्म स्टुडिओसाठी नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. १६ ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत बर्लिन येथे होणार्‍या जगातील आघाडीच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'घात' या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.

छत्रपाल निनावे यांनी दिग्दर्शकीय पदार्पणात स्वत:च लिहून दिग्दर्शित केलेला 'घात' हा चित्रपट भारतातील माओवादी प्रभावित जंगलांच्या किनाऱ्यावरील पार्श्वभूमीवर उलगडणारा स्लो-बर्न थ्रिलर आहे, जो शत्रू, नागरिक आणि पोलिस यांच्यातील तणावपूर्ण परस्परसंवादांवर आधारलेला आहे.(Ghaath Movie world premier in 73rd Berlin International Film Festival)

Ghaath Movie world premier in 73rd Berlin International Film Festival
गूडन्यूज! फक्त 99 रुपयांत 'या' दिवशी पहा 'अवतार 2'...

उत्साहित आणि भारावलेले छत्रपाल म्हणाले, "हा एक मोठा, खडतर आणि साहसी प्रवास होता, पण आता बर्लिन येथे आमच्या चित्रपटाचा प्रीमियर होणे हा मला खूप मोठा सन्मान वाटतो. या वाटेवर आम्हाला अनेक कलाकारांनी प्रेरणा दिली. 'घात' हा चित्रपट विश्वास, विश्वासघात आणि हल्ला यावर आधारलेला आहे.

घनदाट जंगलात शिरताना त्यातील व्यक्तिरेखांच्याही मनांत खोलवर नेणारा हा थ्रिलरपट आहे. आमच्या चित्रपटावर विश्वास ठेवल्याबद्दल मी प्लॅटून वन फिल्म्स आणि दृष्यम फिल्म्सचा आभारी आहे. बर्लिन, भारत आणि त्यापलीकडील्याही प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचेल अशी मला आशा आहे."

Ghaath Movie world premier in 73rd Berlin International Film Festival
Minissha Lamba: 'मला कतरिनासोबत रोमान्स करायला आवडेल..',

अभिनेता जितेंद्र जोशी म्हणाला, "मध्य भारतातील जंगलातील लोकेशन्सवर शूटिंग करणे नक्कीच अवघड आणि आव्हानात्मक होते, पण या अतुलनीय बातमीमुळे केलेली मेहनत फळाला आल्याचे वाटते. चित्रपटातील सर्व कलाकार आणि क्रू यांनी खूप मेहनत घेतली असल्यामुळे टीमसाठी, मराठी सिनेमासाठी आणि संपूर्ण भारतीय सिनेमासाठी हा एक मोठा विजय आहे."

अभिनेते मिलिंद शिंदे म्हणाले, "विषयापासून ते पटकथेपर्यंत 'घात' हा एक अनोखा मराठी चित्रपट आहे. चित्रपटाची कथाच स्वत:मध्ये हिरो आहे. हा चित्रपट बर्लिनमधील सिल्व्हर स्क्रीनवर प्रदर्शित होणे ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब असून, आमच्या मेहनतीचे चीज झाले आहे."

अभिनेत्री सुरुची आडारकर म्हणाली, "घात हा अत्यंत वास्तवदर्शी चित्रपट असून, अनेक लोकांना या परिस्थितीचे आणि या प्रदेशांचे वास्तव माहित नाही. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी मला आशा आहे."

Ghaath Movie world premier in 73rd Berlin International Film Festival
#patlatarghya#- मराठी कलाकार म्हणतायत,'पटलं तर घ्या..', काय आहे भानगड?

प्लॅटून वनचे शिलादित्य बोरा आणि दृष्यमचे मनीष मुंद्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, हे दोघेही नवनवीन प्रतिभांना प्रकाशझोतात आणण्यासाठी आणि भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेण्यासाठी फिल्म जगतात प्रसिद्ध आहेत.

२०१७ च्या पुरस्कार-विजेत्या 'न्यूटन' या हिट चित्रपटानंतर 'घात' या चित्रपटाने निर्माते शिलादित्य बोरा आणि मनीष मुंद्रा यांना दुसऱ्यांदा बर्लिनेल येथे जाण्याची संधी दिली आहे. राजकुमार राव अभिनीत 'न्यूटन'चा २०१७मध्ये बर्लिनमध्ये प्रीमियर झाला होता आणि त्यानंतर हा चित्रपट भारतातर्फे अधिकृतपणे आॅस्करसाठी पाठवण्यात आला होता.

Ghaath Movie world premier in 73rd Berlin International Film Festival
Bigg Boss 16: शालिन आणि टीनानं एकमेकांची इज्जतच काढली; थेट चारित्र्यावर...

या गोड बातमीचा आनंद 'घात'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील एक मनोरंजक फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करून साजरा केला आहे. २०२३ मधील उन्हाळ्यात रिलीज होणार्‍या 'घात'ची निर्मिती प्लाटून वन फिल्म्स आणि दृश्यम फिल्म्स यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com