Prashna: रशियात सुरु झाली मराठवाड्याची चर्चा, संतोष राम यांच्या 'प्रश्न' लघुपटात एवढं मांडलंय तरी काय? Santosh Ram | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

9th Zero Plus International Film Festival, 'Prashna' short film received award

Prashna: रशियात सुरु झाली मराठवाड्याची चर्चा, संतोष राम यांच्या 'प्रश्न' लघुपटात एवढं मांडलंय तरी काय?

Prashna: दिग्दर्शक संतोष राम यांना ९व्या झिरो प्लस फिल्म इंटरनॅशनल फेस्टिव्हल २०२२ ट्युमेन, रशियामध्ये पुरस्कार मिळाला आहे. हा महोत्सव २ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता .या महोत्सवात १५ देशांतील 22 चित्रपट शॉर्ट लाइव्ह अॅक्शन फिल्म्स श्रेणीत प्रदर्शित करण्यात आले होते .महोत्सवाच्या नवव्या आवृत्तीत, ९७ देशांमधून एकूण २००० चित्रपटांमधून या महोत्सवात २२ चित्रपटांचा समावेश केला गेला होता.(9th Zero Plus International Film Festival, 'Prashna' short film received award)

हेही वाचा: Exclusive:'धमक्यांना भीत नाही,माझा पुढचा चित्रपटही महाराजांवरच..','हर हर महादेव'च्या दिग्दर्शकाचा खुलासा

9 ऑक्टोबर रोजी झिरो प्लस फिल्म इंटरनॅशनल फेस्टिव्हल २०२२ ट्युमेन, रशिया यांनी आयोजित केलेल्या समारंभात ९ श्रेणीतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली .संतोष राम यांच्या प्रश्न या लघुपटाला दुर्गम भागातील शिक्षणाच्या विकासाचा प्रश्न मांडण्यासाठी प्रमाणपत्र प्रदान करत गौरव करण्यात आला आहे . ट्युमेन येथील महोत्सवात उपस्थित असलेले राम म्हणाले की, ''या लघुपटाला जागतिक स्तरावर प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने मला आनंद झाला आहे''. .महोत्सवाच्या ठिकाणी सुमारे ४०० लहान मुले आणि पालकांनी लघुपट पाहण्यासाठी हजेरी लावली होती . रशियन भाषेत डब केलेला 'प्रश्न' त्यांनी पहिला. लघुपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांसोबत प्रश्नोत्तरांचे संवाद संत्र देखील आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा: Box office:अमिताभच्या 'ऊंचाई'ने ऋषभ शेट्टीच्या कांताराला फोडला घाम, पहिल्याच दिवशी कमावले इतके करोड

प्रश्न' लघुपट पाहिल्यावर काही रशियन प्रेक्षकांनी माहिती दिली की त्यांच्या देशात अशी शैक्षणिक समस्या नाही. संतोष ने त्याच्या कलाकारांचे, निर्माते डॉ. गणेश सानप आणि डॉ. दिपाली गर्जे सानप यांचे आभार मानले. ओळख मिळणे आणि नंतर जिंकणे ही एक मोठी सन्मानाची गोष्ट आहे. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे”, असे संतोष राम म्हणाले .

हेही वाचा: Samantha- नागाचैतन्यचा घटस्फोटानंतर १ वर्षांनी पुन्हा एकत्र येण्याचा विचार,चर्चेला उधाण...

मराठवाड्यातील ऊस तोड मजुरांच्या मुलांचे शिक्षण आणि त्यांचे जीवन यावर भाष्य करणारा हा लघुपट फिल्मफेअर शॉर्ट फिल्म अवॉर्ड्स २०२० साठी निवडला गेला होता . “प्रश्न” हा एक अत्यंत वास्तववादी लघुपट आहे जो महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील परिस्थिती दर्शवितो . हि कथा गंगा आणि तिचा मुलगा गणेश यांच्याबद्दल आहे.

हेही वाचा: Hera Pheri 3 मध्ये कार्तिक आर्यनची एन्ट्री, अक्षयसोबत स्क्रीन शेअर करणार की केलं रीप्लेस? जाणून घ्या

गंगा आणि तिचा पती राजकुमार हे हंगामी ऊस तोड कामगार म्हणून कंत्राटी पद्धतीने काम करतात.त्यांचे मूळ गाव सोडून कामासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागते. त्यांचा एकुलता एक मुलगा गणेश (वय १० वर्षे) याला त्यांच्यासोबत यावे लागते कारण त्याची काळजी घेण्यासाठी घरी कोणीही नाही. गणेशच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात ही समस्या आहे कारण तो दरवर्षी सहा महिने शाळेत गैरहजर राहतो.

तिसरी शिकलेली गंगा, गणेशच्या शिक्षणाच्या समस्येवर कशी मात करते तसेच स्वतःच्या प्रगतीसाठी ज्ञान संपादन करण्याचा मार्ग शोधते. आर्थिक आणि जातीय वास्तव असूनही त्यांना मार्ग सापडतो. या लघुपटात पूजा राठोड, अनिल राठोड, परमेश्वर देवकत्ते आणि विश्वनाथ वर्दे हे कलाकार आहेत.

हेही वाचा: Rasika Sunil: 'पोट्टी रेतीत लोळून राईली, बाप्पा...'; रसिकाच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

मराठवाड्याशी नाळ असणाऱ्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी या विषयावर तेथील स्थानिक कलावंतांना घेऊन तयार केलेला हा पहिलाच लघुपट असावा. मूळच्या बीड जिल्ह्यातील, सध्या पुण्यात कार्यरत असणाऱ्या डॉ. गणेश आणि दिपाली सानप या दांपत्याने सामाजिक जाणिवेतून त्याची निर्मिती केली आहे. मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या शिक्षणाचा प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी दृकश्राव्य माध्यमाला प्राधान्य देत विषय जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला.