दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीसोबत काय घडलं?; म्हणाली,'मै मरना चाहती हूं' Aaliyah kashyap | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaliyah kashyap

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीसोबत काय घडलं?; म्हणाली,'मै मरना चाहती हूं'

दिग्दर्शक अनुराग कश्यपची(Anurag Kashyap) मुलगी आलिया कश्यप(Aaliyah kashyap) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आलिया कश्यप चे फोटोज् आणि व्हिडीओ खूप व्हायरल होतात आणि चाहते तिची भरभरुन प्रशंसाही करताना दिसतात. आलिया आपल्या वैयक्तिक आयु्ष्यापासून प्रोफेशनल आयुष्याशी संबंधित सर्व छोट्या-छोट्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आताची तिची एक पोस्ट चर्चेत आहे. तिनं तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक अशी पोस्ट लिहिली आहे जी चर्चेत आहे. आलियाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं होतं. ज्यानंतर तिनं या हॅकिंग संदर्भातलीच एक स्टोरी शेअर केली आहे.

हेही वाचा: फिल्मसिटीतील सर्व शूटिंग 'या' कारणानं बंद; कपिल शर्मा शो च्या सेटलाही टाळा

आलिया कश्यपनं इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की,''माझं अकाउंट हॅक झालं होतं,हे खूप भीतीदायक आहे...मला जगायचं नाही,मला मरायचंय. कृपया याआधी जर माझ्या अकाऊंटहून अशी काही पोस्ट किंवा मेसेज आला असेल किंवा त्यासंबंधित काही अजब गोष्ट तुम्हाला पाठवली गेली असेल तर दुर्लक्ष करा''. आपल्या स्टोरीमध्ये आलियानं रडतानाचा इमोजी पोस्ट केला आहे. आलिया कश्यपची ही इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आणि तिचे चाहतेही यावर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. कोणत्याही सेलिब्रिटीचं अकाऊंट हॅक होणं हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी देखील कितीतरी सेलिब्रिटींचे अकाऊंट हॅक(Hacked) झाले आहेत.

Aaliyah kashyap Instagram post image

Aaliyah kashyap Instagram post image

आलिया कश्यप नेहमी आपल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आलिया खूप बोल्ड आणि हॉट फोटोज देखील इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते. आता हे मात्र खरं आहे की आपल्या बोल्ड-हॉट फोटोमुळे जसे तिचे चाहते तिचं कौतूक करतात तसं तिला ट्रोलही केलं जातं. पण आलियावर या ट्रोलिंगचा काहीच परिणाम होत नाही,ती आपले फोटो शेअर करताना दिसतेच. आणि आपल्या मनाप्रमाणे आयुष्याचा आनंद घेताना दिसते.

Web Title: Aaliyah Kashyap Social Media Postmain Marna Chahati Huaccount

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top