फिल्मसिटीत सर्व शूटिंग 'या' कारणानं बंद; कपिल शर्मा शो च्या सेटलाही टाळं Kapil Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Kapil Sharma

फिल्मसिटीत सर्व शूटिंग 'या' कारणानं बंद; कपिल शर्मा शो च्या सेटलाही टाळं

सध्या महाराष्ट्रभरात लोडशेडिंग सुरु आहे. हा प्रश्न गावाकडेच नाही तर शहरी भागातही आता सतावू लागला आहे. कोळशाचा तुटवडा हे कारण सांगितलं जात आहे. हे संकट केवळ एका राज्यापुरतं नाही तर संबध देशावरच घिरट्या घालताना दिसत आहे. सर्वसामान्यांपासून मोठमोठ्या धनाढ्यांना देखील हे वीजेचं संकट टेन्शन देताना दिसत आहे. याच लोडशेडिंगचा फटका गेल्या काही दिवसांत मुंबईतील फिल्म सिटीला(Fiilmcity) देखील बसला. गेल्या दोन दिवसांपासून फिल्म सिटीची बत्ती गुल असल्याचं समोर आलेलं आहे. आणि याच कारणामुळे 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show) सोबतच कितीतरी डेली सोपचं शूटिंगदेखील ठप्प झालेलं आहे. आणि हे खुद्द कपिल शर्मानं(Kapil Sharma) सांगितलं आहे.

हेही वाचा: क्रिकेटर के.एल.राहूलसोबत लग्नाच्या बातम्यांवर आथियानं सोडलं मौन; म्हणाली...

गिप्पी ग्रेवाल आणि दिव्या दत्ताच्या 'मां' सिनेमाचा प्रीमियर होता. इथे कपिल शर्मा देखील पोहोचला. सिनेमाचा मध्यांतर झाला आणि हे तीन कलाकार आपापसात बोलायला लागले. आणि तेव्हाच नेमकं एका वाहिनीच्या कॅमेऱ्यानं गुपचूप हा संवाद रेकॉर्डे केला. जेव्हा कपिल गिप्पी आणि दिव्याला सांगत होता की, ''इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे केवळ त्यांचाच शो नाही तर फिल्मसिटीतल्या कितीतरी मालिकांचं आणि सिनेमांचं सुरु असलेलं शूट बंद पडलं आहे''. ते तिघेही त्यांच्या गप्पांमध्ये व्यस्त होते. सगळेच आपल्या शूटिंग शेड्युलविषयी एकमेकांशी संवाद साधताना दिसले.

हेही वाचा: गुरुपौर्णिमेला लपून बसलेल्या बाळासाहेबांना आनंद दिघेंनी कसं शोधून काढलं?

'द कपिल शर्मा शो' संदर्भात बोलायचं तर रणवीर सिंग आणि शालिनी पांडे आपल्या 'जयेशभाई जोरदार' सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी इथे येऊन गेले. या संदर्भातले शो चे प्रोमो रिलीज केले गेले आहेत. ज्यामध्ये रणवीर सिंग(Ranveer Singh) कीकू शारदा आणि कपिलसोबत धम्माल-मस्ती करताना दिसला.

Web Title: All Shooting In Filmcity Stopped The Set Of Kapil Sharma Show Is Also

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top