चौदा वर्षांनी आमिर खानचा रेकॉर्ड ब्रेक झाला! 'मिस्टर परफेक्शनिस्टला' कुणी मागं टाकलं? | Aamir Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan

Aamir Khan : चौदा वर्षांनी आमिर खानचा रेकॉर्ड ब्रेक झाला! 'मिस्टर परफेक्शनिस्टला' कुणी मागं टाकलं?

Aamir Khan bollywood actor 14 years record break : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाला आणि त्याची मोठ्या प्रमाणात निराशा झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या फ्लॉप चित्रपटाला सामोरं जावं लागणं हे पहिल्यांदाच आमिरच्या बाबत घडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे की काय बॉलीवूडचा किंग खान शाहरुखवर देखील बॉयकॉटचा परिणाम होणार अशी शक्यता नेटकरी वर्तवत होते.

ज्या पठाणविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात होत्या त्या चित्रपटानं सहाशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं वेगवेगळे रेकॉर्डही ब्रेक केले आहे.केवळ भारतातच नाहीतर जगभरातून पठाणनं विक्रमी कमाई केली आहे. यासगळ्यात पठाणच्या कमाईनं सगळ्यांना हादरवून ठेवले आहे. आता तर त्यानं शाहरुखच्या चित्रपटानं आमिरच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.

Also Read - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

चीनमध्ये आमिरच्या चित्रपटांची मोठी लोकप्रियता आहे. आतापर्यत त्याच्या दंगल, थ्री इडियट्स, पीके या चित्रपटांनी कोट्यवधीची कमाई केल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात एक दोन नव्हे तर तब्बल १४ वर्षांनी त्याच्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. चौदा वर्षानंतर आमिरच्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. सोशल मीडियावर हॅशटॅग १४ इयर्स ऑन द टॉप असा ट्रेंड सुरु झाला आहे.

आमिर खान हा असा कलावंत आहे की ज्यानं कित्येकवेळा वेगळे विक्रम केले आहेत. त्याचा २००८ मध्ये गझनी प्रदर्शित झाला होता तेव्हा कुणालाही अंदाज आला नव्हता की हा चित्रपट प्रचंड कमाई करेल. २०१० मध्ये आमिरनं पुन्हा त्याच्याच चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले होते. त्यात त्याच्या थ्री इडियट्सचा समावेश होता.

यावर एका चाहत्यानं लिहिलं आहे की, चौदा वर्ष तुम्ही वेगवेगळे चित्रपट देत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या हिंदी अभिनेत्यांमध्ये तुमचा नंबर होता. आपण त्यावर गेल्या एवढया वर्षांपासून टिकून होतात. हे महत्वाचे आहे. त्याबद्दल तुमचे कौतूक असे त्या चाहत्यानं म्हटले आहे.