आमिर खानच्या लेकीचा झाला साखरपुडा, लाल रंगाच्या गाऊनमध्ये शोभून दिसली इराI Ira Khan Engagement, Aamir Khan Daughter Ira Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan daughter ira khan nupur shikhre engagement, ceremony pics

Ira Khan Engagement: आमिर खानच्या लेकीचा झाला साखरपुडा, लाल रंगाच्या गाऊनमध्ये शोभून दिसली इरा

Ira Khan Engagement: आमिर खानची मुलगी इरा खान गेल्या काही वर्षांपासून नुपुर शिखरेसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. काही दिवसापूर्वीचं नुपुरनं इराला प्रपोज केलं होतं. दोघांच्या कुटुंबासोबतच चाहत्यांनीही या कपलला शुभेच्छा दिल्या होत्या. आता दोघांनी आपल्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. (Aamir Khan daughter ira khan nupur shikhre engagement, ceremony pics)

हेही वाचा: Atal Bihari Vajpayee Biopic:अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी, तर दिग्दर्शन करणार रवी जाधव

इरा आणि नुपुरने नुकताच रितसर साखरपुडा केला आहे. यावेळी इरानं लाल रंगाचा गाऊन आणि नुपुरने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. दोघं एकत्र खूपच क्यूट दिसत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर एक गोड बंधनात अडकल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. दोघांचे कुटुंबिय देखील यावेळी हजर होते. आमिर खानची एक्सवाइफ किरण राव आणि आई देखील सोहळ्याला उपस्थित होत्या. सगळेच ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत होते. आमिर देखील आपल्या मुलीच्या आनंदात सामिल होताना खास ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता आणि पायजमा घालून दिसला.

हेही वाचा: का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

थोडक्यात जरा सांगतो इथे... इरा आणि नुपुर २०२० पासून रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांच्या नात्याला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. जूनमध्ये दोघांनी आपल्या नात्याची अनिव्हर्सरी देखील साजरी केली. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसाठी रोमॅंटिक पोस्ट शेअर करताना दिसतात. अनेकदा दोघांचे रोमॅंटिक फोटो व्हायरल होताना दिसतात.

हेही वाचा: Arjun Kapoor On Sex: 'लग्नाआधी इंटिमेट होणं किती योग्य?',अर्जुन कपूरनं दिलं कडक उत्तर

दुसऱ्या अॅनीव्हर्सरीला इरानं नुपुरसोबत फोटो शेअर करत लिहिलं होतं,''आमच्या नात्याची २ वर्ष पूर्ण, पण असं वाटतं आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. आय लव्ह यू. आशा आहे आपण कायम एकत्र राहू''.

नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे, तो अनेक सेलिब्रिटींचा गुरू आहे. यामध्ये सुश्मिता सेनचा समावेश आहे. इतकंच नाही तर आमिर खानला देखील नुपुर फिटनेसचं ट्रेनिंग देतो.