'लाल सिंग चढ्ढाची' Final Released Date ठरली

आतापर्यत आमिर खान (Aamir khan And Karina Kapoor) आणि करिना कपूरच्या लाल सिंग चढ्ढा (Movie Lal Singh Chaddha) चित्रपटावरुन अनेक वाद समोर आले आहेत.
lal singh
lal singh

Aamir Khan: आतापर्यत आमिर खान (Aamir khan And Karina Kapoor) आणि करिना कपूरच्या लाल सिंग चढ्ढा (Movie Lal Singh Chaddha) चित्रपटावरुन अनेक वाद समोर आले आहेत. त्याच्या प्रदर्शनावरुनही चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत. तीन वेळा या चित्रपटाची रिलिज डेट जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये या वर्षीच्या एप्रिलमधील 14 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावर आमिर खान प्रॉडक्शनच्या(Aamir Khan Production) वतीनं माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्ध हॉलीवूडपट फॉरेस्ट गंप (Forest Gump) या चित्रपटावर आधारित हा चित्रपट असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्सनं (Tom Hanks) भूमिका केली होती.

टॉमला त्या भूमिकेसाठी ऑस्करदेखील मिळाले होते.आता बॉलीवूडमध्ये या चित्रपटाचा रिमेक तयार होत असून गेल्या तीन वर्षांपासून आमिरचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. आमीर हा त्याच्या चित्रपटांबाबत कमालीची गुप्तता पाळतो. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. मिस्टर परफेक्शनिस्टच्या वैयक्तिक आयुष्यात बरीचशी खळबळ सुरु आहे. त्यानं गेल्या वर्षी आपली दुसरी पत्नी किरण राव हिला घटस्फोट दिला. त्यामुळे तो चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी झाला होता. आता त्याला त्याच्या आगामी प्रोजेक्टमधून पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध करावे लागणार आहे.

लाल सिंग चढ्ढामध्ये आमिरसोबत करिना कपूर मुख्य अभिनेत्री आहे. आता आमिरनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामच्या अकाउंटवरुन लाल सिंग चढ्ढाच्या प्रदर्शित होणाऱ्या तारखेविषयी खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यानं बैसाखीच्या दिवशी 14 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा व्हायरल झाल्या होत्या. त्यामध्ये केजीएफच्या 2 ऱ्या भागामुळे लाल सिंग चढ्ढा पुढे ढकलण्यात आला होता. असे सांगण्यात आले होते.

lal singh
Trailer Out: मानवी नात्यांची गुंतागुंत, भावनांचा प्रवास ‘गहराईया’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com