Laal Singh Chaddha मधील Adult Scenes चा मुद्दाही चर्चेत, आमिरचा मोठा खुलासा

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा बॉयकॉट करण्याची मागणी सध्या सोशल मीडियावर जोर धरून आहे. त्यातच सिनेमातील Adult Scenes चा मुद्दाही चर्चेत आला आहे.
Aamir Khan reveals about adult scene in laal singh chaddha...
Aamir Khan reveals about adult scene in laal singh chaddha...Google

Aamir Khan आमिरच्या लाल सिंग चड्ढाला(Laal Singh Chaddha) रिलीज व्हायला आता फक्त ८ दिवस राहिले आहेत. सिल्व्हर स्क्रीनवर आमिर खानला तब्बल ४ वर्षांनी त्याचे चाहते पाहणार आहेत. एकापाठोपाठ आलेल्या सुट्ट्यांच्या आठवड्यात आमिरचा सिनेमा रिलीज होत आहे. आमिरचा हा सिनेमा १९९४ मध्ये आलेल्या हॉलीवूडच्या प्रसिद्ध फॉरेस्ट गम्प सिनेमाचा रीमेक आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का फॉरेस्ट गम्पमधील काही भाग लाल सिंग चड्ढामध्ये सामिल करण्यात आलेला नाही.(Aamir Khan reveals about adult scene in laal singh chaddha...)

Aamir Khan reveals about adult scene in laal singh chaddha...
पोस्टरवर सॅनिटरी पॅड,त्यावर छापला देवाचा फोटो, दिग्दर्शक म्हणतोय,'उगाचच...'

आमिर खानने एका मुलाखतीत सांगितलं की मूळ फॉरेस्ट गम्प सिनेमातील अॅडल्ट सीन्स लाल सिंग चड्ढामध्ये घेण्यात आलेले नाहीत. एका न्यूज पोर्टलशी साधलेल्या संवादा दरम्यान आमिर खाननं म्हटलं आहे की, आमचा सिनेमा लाल सिंग चड्ढा हॉलीवूडच्या फॉरेस्ट गम्पवर आधारित असला तरी भारतीय प्रेक्षकांच्या भावनांचा विचार करता आम्ही मूळ कथानकात थोडे बदल केले आहेत. फॉरेस्ट गम्पमध्ये थोडे अॅडल्ट सीन देखील होते,ज्यांना आम्ही लाल सिंग चड्ढात सामिल केलेलं नाही. आम्हाला वाटत होतं की आमचा सिनेमा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा.

Aamir Khan reveals about adult scene in laal singh chaddha...
Bharti Singh ला आपल्या मुलाला बर्गर विकताना पहायचं आहे; म्हणाली...

हॉलीवूडचा फॉरेस्ट गम्प सिनेमा सुपरहिट ठरला होता. टॉम हॅंक्सच्या दमदार अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकली होती. इतक्या वर्षानंतरही टॉम हॅंक्सचा सिनेमातील भोळेपणा लोकांना लुभवताना दिसतो. आता सिनेमाचा हिंदी रीमके लाल सिंग चड्ढाच्या रुपात येत आहे. आमिर खाननं ही मुख्य भूमिका साकारली आहे. आता आमिर त्या भूमिकेला न्याय देऊ शकला आहे की नाही हे सिनेमा रिलीज झाल्यावर कळेलच.

Aamir Khan reveals about adult scene in laal singh chaddha...
'यामागचा मास्टरमाईंड तोच, त्यानेच...' , आमिर खान विरोधात कंगनाचा मोठा दावा

सध्या पाहिलं तर हिंदी सिनेमे बॉक्सऑफिसवर अपयशी ठरत आहेत. एकापाठोपाठ सिनेमा फ्लॉप होताना दिसत आहेत. याच वातावरणात आता रक्षाबंधनच्या शुभदिनी आमिरचा सिनेमा रिलीज होत आहे. अक्षय कुमारच्या रक्षाबंधन सिनेमाशी आमिरची टक्कर होणार आहे. दोन्ही सिनेमांचा जॉनर खूप वेगळा आहे. दोघेही सुपरस्टार्स, त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे अर्थातच लक्ष सगळ्यांचे असणार. आता वाट पाहायची ११ ऑगस्टची, निकाल सगळ्यांसमोर असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com