आमिरच्या 'मोगुल' बाबतीत मेकर्सचा मोठा निर्णय, अभिनेता पुन्हा अडचणीत...Aamir Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan Starrer 'Mogul' shelved indefinitely after laal singh chaddha failure

आमिरच्या 'मोगुल' बाबतीत मेकर्सचा मोठा निर्णय, अभिनेता पुन्हा अडचणीत...

Aamir Khan Mogul Movie: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या अडचणी काही थांबायचं नाव घेत नाहीत. सध्या त्याच्या मागे साडेसातीच लागलीय असं म्हणूया. म्हणूनच तर लाल सिंग चड्डा(Laal Singh Chaddha) बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर आता आमिरच्या 'मोगुल' सिनेमावर देखील संकटाची नजर पडलीय. हो, मिळालेल्या वृत्तानुसार लाल सिंग चड्ढा बॉक्सऑफिसवर सपशेल आपटल्यानंतर मेकर्सनी मोगल सिनेमाचा प्रोजेक्ट पुढे ढकलल्याचं बोललं जात आहे.(Aamir Khan Starrer 'Mogul' shelved indefinitely after laal singh chaddha failure)

हेही वाचा: 'माझी संपत्ती,मीच कमावलीय..' मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिन स्पष्टच बोलली

मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार बोललं जात आहे की, लाल सिंग चड्ढा विषयी प्रेक्षकांच्या मनातील राग पाहता मेकर्सनी आता 'मोगुल' सिनेमाला सध्या बाजूला ठेवल्याचं कळत आहे. मोगुल सिनेमाविषयी अनेक दिवसांपासून टी-सीरिजचे मालक भूषण कुमार आणि मोगुलचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यामध्ये धुसफूस सुरू होती हे देखील समोर येत आहे. अशात सुभाष कपूर यांनी आमिर खानच्या 'मोगुल' सिनेमाला ब्रेक देत आपला आगामी सिनेमा 'जॉली एलएलबी ३' चं काम करायला सुरुवात केली आहे. 'जॉली एलएलबी ३' मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अशात आमिर खानच्या 'मोगुल' सिनेमाचा प्रोजेक्ट पुढे ढकलण्यात आल्याचं कळत आहे.

हेही वाचा: 'तिथे कॅनडात बसून एक माणूस...,हे कसं शक्य?'; अग्निहोत्री पुन्हा भडकले

मोगुल सिनेमा प्रसिद्ध संगीतकार आणि टी.सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची बायोपीक आहे. गुलशन कुमार यांनी खूप संघर्षानंतर यश संपादित केलं होतं. आधी या सिनेमासाठी अक्षय कुमारला विचारलं गेलं होतं,त्यानंतर मेकर्सनी आमिर खानला संपर्क साधला होता. आमिरला जेव्हा 'मोगुल' ऑफर झाला तेव्हा आमिर खान 'लाल सिंग चड्ढा'वर काम करत होता. त्यावेळी आमिरने 'लाल सिंग चड्ढा' पुर्ण झाल्यानंतर 'मोगुल'वर काम करायला सुरुवात करेन असं म्हटलं होतं. पण आता हा सिनेमा बनेल की नाही,यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Web Title: Aamir Khan Starrer Mogul Shelved Indefinitely After Laal Singh Chaddha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..