'आश्रम 3' मधील ईशा गुप्ताचा लग्न न करण्याचा मोठा निर्णय,व्हायरल झाला Video Esha Gupta | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aashram 3 actress Esha Gupta says she will not get married

'आश्रम 3' मधील ईशा गुप्ताचा लग्न न करण्याचा मोठा निर्णय,व्हायरल झाला Video

वेब सिरीज 'आश्रम 3'(Ashram 3) मध्ये इंटिमेट सीन देणारी ईशा गुप्ता(Esha Gupta) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ईशा गुप्ताने 'आश्रम ३' मध्ये सोनियाच्या भूमिकेतील प्रत्येक सीनला खूप सुंदर पद्धतीनं सादर केलं आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये तिची भलतीच चर्चा होत आहे. 'आश्रम 3' मध्ये बाबा निरालाच्या मॅनेजरच्या भूमिका साकारलेल्या ईशाचा एक व्हिडीओ(Video) सध्या सोशल मीडियावर(Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पापाराझीनं विचारलेल्या लग्नाच्या प्रश्नावर ती एक वक्तव्य करताना दिसली आहे.(Aashram 3 actress Esha Gupta says she will not get married)

हेही वाचा: रोहित शेट्टीनं केली 'सिंघम 3' ची घोषणा;अजयच्या भूमिकेविषयी दिली मोठी माहिती

या व्हिडीओत पापाराझी ईशासोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. ईशा मुंबईतील एका क्लिनिकमधून बाहेर येत असताना तिला पापाराझीनं गाठलं. आणि त्यातील एक फोटोग्राफर ईशाला त्याचा मित्र लग्न करू इच्छित नाही असं सांगत आहे. त्यावर ईशा बोलताना दिसतेय-''का करेल बिचारा लग्न?''

ईशा म्हणताना दिसतेय,''हो,का करेल तो लग्न? मी पण लग्न करणार नाही''. ईशाच्या या व्हिडीओवर प्रत्येकजण 'आश्रम' सिनेमातील डायलॉगची प्रतिक्रिया देताना दिसत आहे. कोणी एकानं लिहिलंय,'जप नाम जानू कह रहा है' ,तर कोणी लिहिलंय-'मोंटी बाबा की जय'.

हेही वाचा: 21 years Of Gadar: सिनेमाचा क्लायमॅक्स सनीनं अचानक बदलला अन् इतिहास घडला...

बॉबी देओल सोबत 'आश्रम3' मध्ये आपल्या बोल्डनेसच तडका लावलेली ईशा गुप्ता आपल्या सोशल मीडियावर देखील बिनधास्त अंदाजात दिसते. इन्स्टाग्रामवर ८.५ मिलियन लोक ईशाला फॉलो करतात. काही दिवसांपूर्वीच तिनं मुलाखतीत म्हटलं होतं की,''पडद्यावर इंटिमेट सीन करताना तिला त्याचं फार टेन्शन आलं नव्हतं. तिच्या म्हणण्यानुसार इंडस्ट्रीत १० वर्ष काम केल्यानंतर इंटिमेट सीन करणं काही मोठी गोष्ट नाही''.

Web Title: Aashram 3 Actress Esha Gupta Says She Will Not Get

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top