Aasharm 3 Trailer | 'बाबाजी जाने मन की बात', बाबा निराला पुन्हा चमकणार | Aashram Season 3 Trailer Viral social | Latest entertainment news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aashram Season 3 Trailer Viral, Latest entertainment news

Aasharm 3 Trailer: 'बाबाजी जाने मन की बात', बाबा निराला पुन्हा चमकणार

Hindi Web Serise- बॉलीवूडचे प्रख्य़ात दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम या (Bollywood News) वेबसीरिजचा तिसरा भाग हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (Aashram Web serise 3) येणार आहे. जेव्हा या तिसऱ्या भागाचे चित्रिकरण सुरु होते त्यावेळी प्रकाश झा यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप त्यांच्यावर कऱण्यात आला होता. बॉबी देओल (Bobby Deol) याची मुख्य भूमिक असलेल्या या चित्रपटामध्ये बबितानं देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. गेल्या काही महिन्यांपासून नेटकऱ्यांना बाबाजींच्या या मालिकेची उत्सुकता होती. भोंदुगिरी, फसवणूक, सर्वसामान्य लोकांच्या भावनेशी खेळून त्यांची होणारी लुट, यासारख्या अनेक मुद्दयांवर या मालिकेतून भाष्य करण्यात आले होते. (Aashram Season 3 Trailer Viral)

आतापर्यत आश्रम मालिकेच्या पहिल्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे. या मालिकेवरुन मोठा वादही झाला होता. मात्र प्रेक्षकांनी या मालिकेला स्विकारुन त्याला आपली पसंती दर्शवली आहे. आता मेकर्सनं आश्रम मालिकेचा तिसऱ्या भागाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आणला असून त्याच्या प्रदर्शनची तारीखही जाहिर केली आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे आश्रमचा तिसरा सीझन लांबणीवर पडला होता. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली होती. भारतामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म लोकप्रिय होण्यात ज्या मालिकांचे नाव घेतले जाते त्यामध्ये आश्रम मालिकेचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल.

हेही वाचा: ईदच्या पार्टीत शहनाझ-सलमानची जवळीक कॅमेऱ्यात कैद; kiss करतानाचा Video Viral

सोशल मीडियावर आश्रमच्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर व्हायरल झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. बाबा निरालाची भांडाफोड या सीझनमधून होणार का असा प्रश्न गेल्या दोन सीझनमधून दिग्दर्शकानं उपस्थित केला होता. तिसऱ्या सीझनमधून त्या प्रश्नाचे उत्तर मिळणार का याचं उत्तर त्यांना लवकरच मिळणार आहे. तिसऱ्या सीझनमध्ये ईशा गुप्ता वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. प्रकाश झा दिग्दर्शित ही मालिका एम एक्स प्लेयरवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

हेही वाचा: Movie Review- शेर शिवराज.....हिंदवी स्वराज्याचे सुवर्णपान

Web Title: Aashram 3 Season Trailer Viral Social Media Baba Viral Ready To Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top