मी चुकून तिचे नाव घेतले, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर अब्दुल रझाकने मागितली ऐश्वर्याची जाहीर माफी| Abdul Razzaq Aishwarya Rai Bachchan

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने काही दिवसांपुर्वी ऐश्वर्या रायचं नाव घेऊन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं
Abdul Razzaq apologizes to Aishwarya rai bachchan after controversial remark
Abdul Razzaq apologizes to Aishwarya rai bachchan after controversial remarkSAKAL

Abdul Razzaq - Aishwarya Rai Bachchan News: पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटपटू अब्दुल रझाक सध्या चांगलाच चर्चेत आहे. अब्दुलने काही दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचं नाव घेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

अब्दुल रझाकने केलेल्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्याला लोकांच्या टिकेला सामोरं जावं लागलं. पण आता अब्दुलने सर्वांसमोर त्या वक्तव्यासंबंधी जाहीर माफी मागितली आहे.

Abdul Razzaq apologizes to Aishwarya rai bachchan after controversial remark
Rahul Vaidya - Disha Parmar: दोन महिन्यानंतर राहुल - दिशाने केलं मुलीचं बारसं, ठेवलं हे खास नाव

अब्दुल रझाकची जाहीर माफी

अब्दुल रझाक माफी मागताना म्हणाला, "मी अब्दुल रज्जाक आहे...काल पत्रकार परिषदेदरम्यान, आम्ही क्रिकेट कोचिंग आणि PCB चा हेतू यावर चर्चा करत होतो. त्यावेळी बोलताना माझी जीभ घसरली आणि चुकून ऐश्वर्या रायचे नाव घेतले. मी तिची वैयक्तिक माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला दुसरे उदाहरण द्यायचे होते, पण चुकून तिचे नाव वापरले,” असं रजाकने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाला होता अब्दुल रझाक?

अब्दुल एका पत्रकार परिषदेत म्हणाला होता, "सध्या पाकिस्तान संघ आणि वर्ल्डकप खेळाडूंच्या कामगिरीबद्दल येथे खूप चर्चा होत आहे. मला वाटते की खेळाडूंमध्ये सुधारणा आणि विकसीत करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी ऐश्वर्या रायशी लग्न करावं जेणेकरून एक संस्कारी आणि सर्वगुण संपन्न मूल होईल, तर तसं कधीच होणार नाही. त्यामुळे तुमचा हेतू आधी बरोबर ठरवावा लागेल."

रझाकच्या या वक्तव्यानंतर उपस्थित सर्व जण हसायला लागले.

अब्दुल रझाक झाला टिकेचा धनी

अब्दुल रझाकच्या या विधानानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर चहूबाजूंनी टिकेची झोड उठली. अब्दुल रझाकने केलेलं विधान थर्ड क्लास आहे, याशिवाय त्या विधानावर पाकिस्तान खेळाडू निर्लज्जपणे हसत त्याला समर्थन देत आहेत, अशा शब्दात लोकांनी अब्दुल रझाक आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर नाराजी व्यक्त केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com